Ahilyanagar Food Adulteration Raids: अहिल्यानगरमध्ये भेसळखोरांवर धाडी; सोयाबीन तेल, मसाल्याचा १० लाखांचा साठा जप्त!

कोपरगाव, राहुरीत अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; निकृष्ट दर्जाचा संशय आणि लेबलिंग नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी तीन ठिकाणी छापे
Food Adulteration Raid
Food Adulteration RaidPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: सण-उत्सवानिमित्त शहरासह जिल्ह्यात भेसळखोरांनी पुन्हा डोके वर काढल्याची चर्चा असतानाच, नगरच्या अन्न व औषध प्रशासनाने कोपरगाव, राहुरीत तीन ठिकाणी छापे टाकून सोयाबीन तेल, मसाला पावडरचा सुमारे दहा लाखांचा साठा जप्त केला आहे. दरम्यान, आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नगरमध्ये लक्ष घातले, तरच भेसळखोरांचे पाळेमुळे उखडून फेकणे शक्य होईल, असाही जनतेचा सूर आहे.

Food Adulteration Raid
Ahilyanagar House Burglary Case: अहिल्यानगरमध्ये घरफोडीचा गुन्हा उघड; मध्य प्रदेशातील मुख्य आरोपीसह चौघांना अटक

दिवाळी जवळ आली आहे. बाजारपेठा फुलू लागल्या आहेत. मात्र, खाद्यपदार्थासह दुग्धजन्य पदार्थ खरेदी करतानाही अजुनही जनतेच्या मनात शुद्धतेबाबत प्रश्नचिन्ह आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून कारवायांमध्ये सातत्य दिसत नाही. त्यामुळे ही भीती कायम असल्याचे बोलले जाते.

Food Adulteration Raid
Ahilyanagar Farmers Crop Loss Compensation: अहिल्यानगर जिल्ह्यातील ९.३६ लाख शेतकऱ्यांना दिवाळीसाठी ५ हजारांची मदत!

दरम्यान, सहाय्यक आयुक्त अपर्णा भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने काल कोपरगावात दोन ठिकाणी छापे टाकले. लक्ष्मी किराणा स्टोअर्समध्ये तपासणी केली. यावेळी तेलाचा साठा निकृष्ट दर्जाचा असल्याचा संशय तसेच अस्वच्छ वातावरणात साठवणूक केल्यामुळे सुमारे २,३७,१८६ रुपये किंमतीचे 1168 किलो रिफाईंड सोयाबीन तेल (व्हाईट ॲपल)जप्त केले आहे.

Food Adulteration Raid
Mirajgaon Woman House Demolition: मिरजगावमध्ये एकल महिलेचे घर पाडले; दोन मुलांसह रस्त्यावर संसार थाटण्याची वेळ

तसेच रिनाज मसाला ड्राय फ्रूट अँड राईस सेंटर येथूनही मिक्स्ड मसाला पावडर (सालन मसाला ए. ए. स्पायसेस) ८८ किलो, स्पेशल मिरची पावडर (सात्विक) १७१ किलो , असा एकूण १,२१,२०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. लेबलिंगच्या नियमांचे उल्लंघन, अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय तसेच अस्वच्छ व आरोग्यास अपायकारक परिस्थितीत साठवणूक केल्याने ही कारवाई केल्याचे समजले.

Food Adulteration Raid
Shrirampur Water Shortage: श्रीरामपूरकरांवर पाणीटंचाईचे संकट! आता आठ दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा

तसेच, राहुरीतही आनंद ट्रेडींग कंपनीतही पथकाने तपासणी केली. यावेळी कमी दर्जाचे अन्न पदार्थ असल्याच्या संशय तसेच लेबलींग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी, सुमारे 6 लाख 31 हजार रुपये किमतीचा तीन हजार किलो रिफाईंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news