Ahilyanagar House Burglary Case: अहिल्यानगरमध्ये घरफोडीचा गुन्हा उघड; मध्य प्रदेशातील मुख्य आरोपीसह चौघांना अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; सोन्याची अंगठी, चांदीचे बिस्कीट, मोबाईलसह १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
Arrested
ArrestedPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: शहरामधील कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत चोरांचा शोध लावला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्य प्रदेशातील मुख्य आरोपीसह चार जणांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Arrested
Ahilyanagar Farmers Crop Loss Compensation: अहिल्यानगर जिल्ह्यातील ९.३६ लाख शेतकऱ्यांना दिवाळीसाठी ५ हजारांची मदत!

कपिल चंपालाल चावडा (वय २३), राजा चेयनसिंग पटेल (वय २३), अनिल रामनारायण तिवारी (वय ५६, रा. छत्रपती संभाजीनगर), भारत नानासाहेब जोशी (वय ३२, छत्रपती संभाजीनगर) १३ ऑक्टोबर २०२६ रोजी फिर्यादी विवेक मारोतराव साखरे (वय ६४, रा. शिवनेरी चौक, अहिल्यानगर) यांच्या बंद घराचे टाळे तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबवली होती. याप्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Arrested
Mirajgaon Woman House Demolition: मिरजगावमध्ये एकल महिलेचे घर पाडले; दोन मुलांसह रस्त्यावर संसार थाटण्याची वेळ

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सहायक पोलिस निरीक्षक हरीष भोये व पोलिस अंमलदारांचे एक विशेष पथक तयार करून तपासाकामी रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली की, वरील गुन्हा कपिल चावडा (रा. मध्य प्रदेश) याने साथीदारासह केला असून तो सध्या नेवासा फाटा येथे येणार आहे.

Arrested
Shrirampur Water Shortage: श्रीरामपूरकरांवर पाणीटंचाईचे संकट! आता आठ दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा

त्यानुसार पथकाने सापळा रचून कपिल चावडा यास ताब्यात घेतले. त्याने आपल्या साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेल्या दागिन्यांपैकी काही ऐवज राजा चेयनसिंग पटेल याच्याकडे असून उर्वरित दागिने छत्रपती संभाजीनगर येथे विकल्याची माहिती दिली. राजा पटेल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, ५० ग्रॅम वजनाचे एक चांदीचे बिस्कीट, एक मोबाईल, एक लोखंडी पाना आणि एक बॅग असा एकूण १ लाख सहा हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Arrested
Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ३५६ अधिकारी-कर्मचारी तैनात

चोरीचा मुद्देमाल खरेदी करणारे अनिल तिवारी, भारत जोशी यांनाही ताब्यात घेण्यात आले. आरोपींना व जप्त केलेल्या मुद्देमालासह कोतवाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, गुन्ह्याचा पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलिस अंमलदार अरविंद भिंगारदिवे, योगेश भिंगारदिवे, शाहीद शेख, संदिप पवार, फुरकान शेख, मनोज साखरे, अमोल कोतकर, महादेव भांड यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news