Shrirampur Water Shortage: श्रीरामपूरकरांवर पाणीटंचाईचे संकट! आता आठ दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा

तलावात केवळ १३ दिवस पुरेल इतकाच साठा; भंडारदऱ्याचे आवर्तन डिसेंबरमध्ये, नागरिकांना अडीच महिने पाणीटंचाईचा सामना करण्याची शक्यता
Water Tanker
Water TankerPudhari
Published on: 
Updated on: 

श्रीरामपूर: सलग ३६५ दिवस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या श्रीरामपूर नगरपरिषदेवर आठ दिवसातून एकदा म्हणजे दर बुधवारी पाणीपुरवठा करण्याची नामुष्की येथील नगरपालिकेवर ओढावली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना आजपासूनच अडीच महिने तरी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

Water Tanker
Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ३५६ अधिकारी-कर्मचारी तैनात

भंडारदरा धरणातून सुटणाऱ्या आवर्तानुसार आणि आपल्या साठवण तलावात उपलब्ध असलेल्या पाण्याच्या साठ्यानुसार नगरपालिकेने आठ दिवसातून एकदा पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष करण ससाणे यानी तातडीने काल मंगळवारी (दि.२७) दुपारी सत्ताधारी, विरोधी सर्व नगरसेवकांची बैठक आयोजित करून हा निर्णय घेतला आहे.

Water Tanker
Ahilyanagar Drought Relief: दुष्काळ निवारणासाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन; साई संस्थानकडून ५ कोटींचे योगदान

भंडारदरा धरणाचे आवर्तन १६ डिसेंबरला सुटणार आहे. सध्या बाष्पीभवनामुळे श्रीरामपूरपर्यंत पाणी येण्यास चार ते पाच दिवस लागू शकतात. त्यामुळे किमान २० ते २१ डिसेंबरपर्यंत पाणी श्रीरामपूरपर्यंत पोहचू शकते. सध्या श्रीरामपूर तलावात १३ दिवस पुरेल इतके पाणी आहे. हे पाणी नगरपरिषदेला २१ डिसेंबरपर्यंत पुरवायचे असल्यामुळे आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नगराध्यक्ष करण ससाणे यांनी दिली.

Water Tanker
Kukadi Irrigation Water Release: शेतकऱ्यांना दिलासा! कुकडीचे आवर्तन ५ नोव्हेंबरपासून, घोडचे पाणी १० नोव्हेंबरला सुटणार

याबाबत नगरसेवकांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन या १० ते १२ दिवसात एखादे आवर्तन सोडावे, अशी विनंती केली जाणार आहे. असे झाल्यास पाणी सोडण्याचा कालावधी कमी होऊ शकतो. दरम्यान, नवीन १७३ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. त्यातील साठवण तलावाचे काम डिसेंबर पूर्ण होणे अपेक्षित असेल तरी कामाची गती बघता ते शक्य होणार नाही. या कामासाठी लागणारा १५ कोटी रुपयांचे निधी शासनाकडे थकलेले आहे. त्यातील दहा टक्के पालिकेचा हिस्सा असतो.

Water Tanker
Leopard Attack: नगर जिल्ह्यात बिबट्याची दहशत! शाळकरी मुलासह ऊसतोड मजुरांवर हल्ला

पालिकेने त्यांचा हिस्सा सदर बँक खात्यामध्ये दीड कोटी रुपये वर्ग केलेले आहे. उर्वरित साडेतीन कोटी रुपये शासनाकडून अद्याप प्राप्त झालेले नाही. हा निधी येण्यासाठीचा २० ते २२ दिवसांचा कालावधी उलटलेला आहे, असे असले तरी संबंधित ठेकेदाराने आपले काम बंद ठेवलेले नाही. मात्र या कामावर कामगार वाढवून त्याला गती देण्याची गरज आहे, असे झाले तरच श्रीरामपूरकरांवरील पाणी टंचाईचे संकट दूर होऊ शकणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष ससाणे यांनी दिली.

१३ दिवस पुरेल इतकेच पाणी

शहरात दररोज प्रत्येक व्यक्तीला १३६ लिटर पाणी लागते. तर शहरातील एकुण लोकसंख्येला २ कोटी लिटर पाणी लागते. सध्या तलावात केवळ १३ दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. भंडारदरा धरणाचे आवर्तन १६ डिसेंबर रोजी सुटणार आहे. श्रीरामपूरात पाणी येण्यास चार ते पाच दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे २० ते २१ दिवस पाणी पोहचू शकते. त्यामुळे श्रीरामपूर शहराला दोन महिने तरी पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news