Ahilyanagar Farmers Compensation: अहिल्यानगरच्या अडीच लाख शेतकऱ्यांची दिवाळी अग्रिमविनाच; पाच हजारांच्या मदतीची प्रतीक्षा!

१२ लाख १५ हजार शेतकरी खरीप नुकसानीने बाधित; ८ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ४०३ कोटींचे अग्रिम जमा
Farmers Compensation
Farmers CompensationPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: पावसाअभावी खरीप पिके वाया गेल्‍याने १२ लाख १५ हजार शेतकर्‍यांना नुकसानभरपाई दिवाळीपूर्वी अदा करणे शक्‍य नसल्‍याने शासनाने या बाधित शेतकर्‍यांना दिवाळी साजरी करण्‍यासाठी सरसकट पाच हजार रुपये अग्रिम देण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यानुसार दिवाळीपूर्वी जवळपास साडेनऊ शेतकर्‍यांच्‍या बँक खात्‍यावर अग्रिम जमा झाल्‍याची शक्‍यता आहे. उर्वरित अडीच लाख शेतकर्‍यांना अग्रिमअभावी हात उसनवारीवर दिवाळी साजरी करण्‍याची वेळ आली.

Farmers Compensation
Ahilyanagar Water Shortage: अहिल्यानगरमध्ये भीषण पाणीटंचाई; २६३ गावांची तहान ३१० टँकरवर!

सरासरी कमी पाऊस आणि वाढता खंड यामुळे कापूस, सोयाबीन, बाजरी, मका आदींसह खरीप हंगामी तृणधान्‍ये, कडधान्‍ये शेतकर्‍यांच्‍या हातीच लागली नाहीत. शासनाने पंचनामे करण्‍याचे आदेश दिल्‍यानंतर कृषी व महसूल विभागाने पंचनामे केले. पंचनाम्‍यात ९ लाख ६२ हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झाल्‍याचे समोर आले. याचा फटका जिल्ह्यातील १२ लाख १५ हजार शेतकर्‍यांना बसला.

Farmers Compensation
Shrirampur Water Shortage: श्रीरामपूरकरांची पाणीटंचाई दूर होणार; भंडारदरा धरणातून आजपासून पाणी सोडणार!

या बाधित शेतकर्‍यांना दोन हेक्‍टरपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्‍यासाठी १ हजार ३६५ कोटी १४ लाख रुपयांचा निधी आवश्‍यक आहे. त्‍याबाबत जिल्‍हा प्रशासनाने शासनाकडे अहवाल पाठविला आहे. अशातच दिवाळी सण जवळ आला. संपूर्ण नुकसानभरपाई शेतकर्‍यांच्‍या खात्‍यावर जमा करण्‍यासाठी अवधी लागणार असल्‍याने शासनाने दिवाळीसाठी पाच हजार रुपये अग्रिम सरसकट बाधित शेतकर्‍यांच्‍या नावे करण्‍याचा निर्णय घेतला.

Farmers Compensation
Chandanapuri Ghat Accident: चंदनापुरी घाटात ७ ते ८ वाहनांचा विचित्र अपघात; सहा ते सातजण जखमी!

त्‍यानुसार जिल्‍हा प्रशासनाने बाधित शेतकर्‍यांचीयादी शासनाकडे पाठवली. त्‍यानुसार शासनाकडून टप्‍प्‍याटप्‍प्‍याने अग्रिम जमा केले जाऊ लागले. दिवाळीपूर्वी ६ नोव्‍हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ८ लाख ७ हजार २८४ बाधित शेतकर्‍यांच्‍या बँक खात्‍यावर ४०३ कोटी रुपयांचे अग्रिम जमा झाल्‍याची शासनपातळीवर नोंद आहे. त्‍यानंतर लक्ष्‍मीपूजनाचा एकच दिवसबाकी होता.

Farmers Compensation
Jamkhed Water Shortage: जामखेडकरांना १५ ते २० दिवसांनी पाणी; हक्काचे पाणी न मिळाल्यास न्यायालयात जाणार!

या कालावधीत एक दीड लाख शेतकर्‍यांना अग्रिम मिळाले असल्‍याची शक्‍यता आहे. त्‍यानंतर अधिकारी व कर्मचार्‍यांना तसेच बँकांना दिवाळी सुटी होती. खरीप हातचा गेल्‍याने पैशाची चणचण भासली. ज्‍या बाधितांना दिवाळीपूर्वी अग्रिम मिळाले नाही अशा शेतकर्‍यांना अग्रिमच्‍या भरोशावर हात उसणवारी करीत दिवाळी साजरी करावी लागली. काहींना तेही मिळाले नसल्‍याने त्‍यांची दिवाळी अंधारातच गेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.