Ahilyanagar Water Shortage: अहिल्यानगरमध्ये भीषण पाणीटंचाई; २६३ गावांची तहान ३१० टँकरवर!

५ लाख ३० हजारांहून अधिक लोकसंख्या पाणीटंचाईच्या विळख्यात; पाथर्डी तालुक्याला सर्वाधिक झळ, ४७५ कोटींचा कृती आराखडा मंजूर
Water Tanker
Water TankerPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: यंदा पावसाअभावी जिल्ह्यातील पाणीटंचाईची परिस्‍थिती गंभीर होऊ लागली असून, पाणीटंचाईग्रस्‍त गावांच्‍या संख्‍येत दिवसेंदिवस नवीन गावांची भर पडत आहे. पारनेर, शेवगाव, कर्जत व पाथर्डी या शहरांनाही टंचाईची झळ बसली आहे. सध्‍या नऊ तालुक्‍यांतील २६३ गावांतील विहिरी कोरड्याठाक पडल्‍या असून, ५ लाख ३० हजार ७९४ जनतेच्‍या तोंडचे पाणी पळाले आहे. पाण्‍यासाठी या जनतेची दाहीदिशा भटकंती सुरू असून, या जनतेची ३१० टँकरद्वारे तहान भागवली जात आहे. पाथर्डी तालुक्‍यात झळा तीव्र असून, १२५ टँकर या तालुक्‍यात धावत आहेत.

Water Tanker
Shrirampur Water Shortage: श्रीरामपूरकरांची पाणीटंचाई दूर होणार; भंडारदरा धरणातून आजपासून पाणी सोडणार!

यंदा जुलै महिना वगळता उर्वरित तीनही महिन्‍यांत पावसाची तूट झाली. जुलै महिन्‍याच्‍या पावसावर खरीप पेरणी शंभर टक्‍के झाली. मात्र त्‍यानंतर ऑगस्‍ट व सप्‍टेंबर महिन्‍यांत पावसाचा मोठा खंड पडला. त्‍यामुळे कापूस, सोयाबीन, बाजरी, मका, मूग, उडीद व इतर खरीप पिकांची वाढ खुंटून पिके हातची गेली. पाण्‍याअभावी खरिपापाठोपाठ रब्‍बी हंगामदेखील हातचा जाणार असल्‍याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Water Tanker
Chandanapuri Ghat Accident: चंदनापुरी घाटात ७ ते ८ वाहनांचा विचित्र अपघात; सहा ते सातजण जखमी!

दमदार पावसाअभावी सप्‍टेंबरमध्‍ये भूजलपातळी सरासरी तीन मीटरने खालावली गेली. त्‍यामुळे विहिरींनी तळ गाठला असून, गाव पातळीवरील तलाव कोरडेठाक पडले आहेत. पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्‍यामुळे भंडारदरा, निळवंडे व आढळा ही तीनही धरणे ओव्‍हर-फ्‍लो झाली. मुळा धरणही ९५ टक्‍के भरले. त्‍यामुळे उत्तर भागांत लाभक्षेत्रातील जनतेला दिलासा मिळाला. मात्र, दक्षिण भागातील सीना, खैरी, मांडओहळ या धरणांत २५ टक्‍क्‍यांच्‍या आसपास पाणीसाठा उपलब्‍ध आहे. त्‍यामुळे या भागांतील जनतेला उन्‍हाळा कसा जाणार या भीतीने ग्रासले आहे.

Water Tanker
Jamkhed Water Shortage: जामखेडकरांना १५ ते २० दिवसांनी पाणी; हक्काचे पाणी न मिळाल्यास न्यायालयात जाणार!

यंदा भूजलपातळी कमालीची खालावली गेल्‍याने संगमनेर, नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी व नेवासा आदी नऊ तालुक्‍यांतील २६३ गावे आणि १ हजार ५३७ वाड्यांत पाणीटंचाईच्‍या झळा बसल्‍या आहेत. पाथर्डी तालुक्‍यातील ७८ गावे आणि ४६५ वाड्यांतील ५ लाख ४ हजार ६४४ लोकसंख्‍येला २८५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या पाणीटंचाईच्‍या झळा तालुक्‍याचे मुख्‍यालय असलेल्‍या पारनेर, शेवगाव, पाथर्डी व कर्जत या शहरांना बसल्‍या आहेत. या चारही पालिकांतील २६ हजार १५० लोकसंख्‍येला २५टँकरव्‍दारे पाणीपुरवठा सुरु आहे.

Water Tanker
Rahuri Honey Trap Case: राहुरीत हनीट्रॅपचा धक्कादायक प्रकार; तरुणाला घरात घुसून मारहाण, जबरदस्तीने औषध पाजले!

नोव्‍हेंबर महिन्‍यात ही परिस्‍थिती आहे. अद्याप साडेआठ महिनेबाकी आहे. फेब्रुवारीनंतर उन्‍हाच्‍या झळा तीव्र झाल्‍यानंतर भूजलपातळी आणखी खालावत जाऊन टंचाईग्रस्‍त गावांची संख्‍या कमालीची वाढणार आहे. त्‍यामुळे जनतेला तसेच जनावरांना पाणीपुरवठा करण्‍यासाठी टँकरची संख्‍या एक हजारांच्‍या पुढे जाण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे यंदाचा टंचाई कृती आराखडा ४७५ कोटी रुपयांचा मंजूर करण्‍यात आला आहे.

तालुकानिहाय टँकर संख्‍या

नगर : ३५, पारनेर : १९, श्रीगोंदा : ५, कर्जत :३९, जामखेड :३१, शेवगाव : ४१, पाथर्डी :१००, नेवासा :२, संगमनेर : १३, पारनेर शहर :१३, पाथर्डी शहर: ३, शेवगाव: ४, कर्जत : ५.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.