Jamkhed Water Shortage: जामखेडकरांना १५ ते २० दिवसांनी पाणी; हक्काचे पाणी न मिळाल्यास न्यायालयात जाणार!

३० वाड्या-वस्त्यांसाठी १५ टँकर मंजूर, मात्र शहर टँकरच्या प्रतीक्षेत; भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात यांचा प्रशासनाला इशारा
Water Supply
Water SupplyPudhari
Published on: 
Updated on: 

जामखेड: शहरासह तालुक्यातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिकांना १५ ते २० दिवसांच्या अंतराने पाणी मिळत आहे. तालुक्यातील ३० वाड्या-वस्त्यांसाठी प्रशासनाने १५ टँकर मंजूर केले; मात्र शहरासाठी स्वतंत्र टँकरची व्यवस्था झालेली नाही. या परिस्थितीवरून प्रा. मधुकर राळेभात यांनी प्रशासनाला धारेवर धरले. जामखेडला हक्काचे पाणी मिळाले नाही, तर न्यायालयात जाणार, असा इशाराही त्यांनी दिला.

Water Supply
Rahuri Honey Trap Case: राहुरीत हनीट्रॅपचा धक्कादायक प्रकार; तरुणाला घरात घुसून मारहाण, जबरदस्तीने औषध पाजले!

राळेभात म्हणाले की, नागरिकांना किमान आठ दिवसांनी नियमित पाणीपुरवठा झाला पाहिजे. १५ दिवसांनी पाणी मिळणार असेल, तर नागरिकांनी एवढे पाणी साठवायचे कुठे? आज १२ दिवस उलटूनही नागरिकांना पाणी मिळत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात टँकरची व्यवस्था करून तातडीने पाणीपुरवठा सुरू करावा.

Water Supply
Ahilyanagar Theatre Complex: नगरकरांचे नाट्यसंकुलाचे स्वप्न लवकरच साकारणार; काम ९५ टक्के पूर्ण!

शेतीसाठी कुकडीचे पाणी मिळावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. कृष्णा खोऱ्यातील लागवडीलायक क्षेत्राच्या प्रमाणात जामखेडला पाणी मिळाले पाहिजे. आष्टी, परांडा, भूम आणि करमाळा या भागांना पाणी मिळत असताना जामखेडलाच पाणी का मिळत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आ. रोहित पवार यांच्यावर टीका करताना घोषणा करण्यापेक्षा जामखेडच्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाणी मिळणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.

Water Supply
Bhandardara Nilwande Dam Water Release: भंडारदरा, निळवंडेतून आजपासून पाणी सोडणार; दुष्काळी भागांना दिलासा!

उजनीचे पाणी जामखेडला मिळाल्यास शहराचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. त्यामुळे अपूर्ण पाणीपुरवठा योजनांना गती देण्याची गरज आहे. कृष्णा-भीमा जलस्थिरीकरणाचा लाभ जामखेडला का मिळत नाही? आष्टी, परांडा आणि भूम येथे उपसा सिंचन योजना असताना जामखेडसाठी अशी योजना का नाही? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

पाणीटंचाईमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने जबाबदारी झटकण्याऐवजी ठोस उपाययोजना कराव्यात. पुढील दीड वर्षाचे पाणी नियोजन आतापासून करावे. जामखेडला हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी आवश्यक निर्णय न झाल्यास न्यायालयात जाणार, असा इशारा प्रा. राळेभात यांनी दिला.

Water Supply
Women Online Love Fraud: लग्नाचे आमिष दाखवून महिलांची कोट्यवधींची फसवणूक; अभियंता असलेला सराईत आरोपी कर्जत पोलिसांच्या जाळ्यात

शहरवासीय टँकरच्या प्रतीक्षेत!

तालुक्यातील ३० वाड्या-वस्त्यांसाठी १५ टँकर मंजूर झाले असले, तरी शहरासाठी अतिरिक्त टँकर सुरू झालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मंजूर टँकर तातडीने सुरू करून शहरवासीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

मधुकर राळेभात यांचा घरचा आहेर!

ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात हे भाजपचे नेते असून, जामखेड नगर परिषदेत भाजपची सत्ता, नगराध्यक्ष आणि १५ नगरसेवक असतानाही शहरातील पाणीटंचाई व टँकर सुरू करण्याच्या प्रश्नावर त्यांनी प्रशासनासह सत्ताधारी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सत्ताधारी पक्षातीलच ज्येष्ठ नेत्याने पाणीप्रश्नावरून आपल्याच नगराध्यक्ष व नगरसेवकांना जाब विचारल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.