Chandanapuri Ghat Accident: चंदनापुरी घाटात ७ ते ८ वाहनांचा विचित्र अपघात; सहा ते सातजण जखमी!

पुणे-नाशिक महामार्गावर ट्रकचा वाहनांवरील ताबा सुटला; वाहनांच्या लांबच लांब रांगा, जुन्या घाटातून वाहतूक वळवली
Chandanapuri Ghat Accident
Chandanapuri Ghat AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

संगमनेर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील चंदनापुरी घाटात काल शनिवारी (दि.१४) सायंकाळी सात ते आठ वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात सहा ते सातजण किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

Chandanapuri Ghat Accident
Jamkhed Water Shortage: जामखेडकरांना १५ ते २० दिवसांनी पाणी; हक्काचे पाणी न मिळाल्यास न्यायालयात जाणार!

या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. याबाबत डोळासणे महामार्ग पोलिस मदत केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक मालवाहू ट्रक पुण्याकडून नाशिकच्या दिशेने जात होता.

Chandanapuri Ghat Accident
Rahuri Honey Trap Case: राहुरीत हनीट्रॅपचा धक्कादायक प्रकार; तरुणाला घरात घुसून मारहाण, जबरदस्तीने औषध पाजले!

दरम्यान, चंदनापुरी घाटात आल्यानंतर ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रकची पुढील वाहनांना जोरदार धडक बसली. या धडकेमुळे पुढील वाहने एकमेकांवर आदळली. अशा प्रकारे जवळपास सात ते आठ लहान-मोठ्या वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये सहा ते सातजण किरकोळ जखमी झाले आहेत.

Chandanapuri Ghat Accident
Ahilyanagar Theatre Complex: नगरकरांचे नाट्यसंकुलाचे स्वप्न लवकरच साकारणार; काम ९५ टक्के पूर्ण!

अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक राजू खेडकर, विठ्ठल शरमाळे, खंडेराव रहाणे, विकास काकड आणि गणेश सदगीर तसेच टोलनाक्याची पेट्रोलिंग गाडी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अपघातामुळे पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांसह प्रवाशांचे मोठे हाल झाले.

Chandanapuri Ghat Accident
Bhandardara Nilwande Dam Water Release: भंडारदरा, निळवंडेतून आजपासून पाणी सोडणार; दुष्काळी भागांना दिलासा!

दरम्यान, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुण्याकडून नाशिकच्या दिशेने जाणारी वाहने जुन्या चंदनापुरी घाटातून वळविण्यात आली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यासाठी हिवरगाव पावसा टोलनाक्यावरील क्रेनला पाचारण करण्यात आले. क्रेनच्या साहाय्याने काही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. त्यानंतर काही प्रमाणात वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनीही वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.