Shrirampur Water Shortage: श्रीरामपूरकरांची पाणीटंचाई दूर होणार; भंडारदरा धरणातून आजपासून पाणी सोडणार!

नदीकाठच्या गावांनाही दिलासा; जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश, शहरातील पाणीवाटपाचे आज नियोजन जाहीर होणार
Ahilyanagar News
Bhandardara Dampudhari
Published on: 
Updated on: 

श्रीरामपूर: पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर भंडारदरा धरणातून बिगर सिंचनाचे, तर निळवंडे धरणातून सिंचनाचे आवर्तन आज रविवार (दि. १५) पासून सुरू करण्याचे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्याने नदीकाठच्या गावांसह श्रीरामपुरकरांना दिलासा मिळणार आहे.

Ahilyanagar News
Chandanapuri Ghat Accident: चंदनापुरी घाटात ७ ते ८ वाहनांचा विचित्र अपघात; सहा ते सातजण जखमी!

सध्या श्रीरामपूर शहराला मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने सुरुवातीला आठवड्यातून एकदा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची घोषणा होताच शहरातील नागरिकांमध्ये वेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यानंतर आ. हेमंत ओगले व नगराध्यक्ष करण ससाणे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेऊन पाणीप्रश्नावर चर्चा करून १ डिसेंबरला आवर्तन सोडणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर पालिकेने नोव्हेंबर महिन्याचे तारखेनुसार पाणी पुरवठ्याचे नियोजन करून आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा करणे व ३१ डिसेंबरपर्यंत पाणी देण्याबाबतचे नियोजन केले. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता.

Ahilyanagar News
Jamkhed Water Shortage: जामखेडकरांना १५ ते २० दिवसांनी पाणी; हक्काचे पाणी न मिळाल्यास न्यायालयात जाणार!

मागील काही दिवसांपासून भंडारदरा धरणातून पाणी सोडण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने विखे पाटील यांची भेट घेऊन नदीकाठच्या गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई विचारात घेऊन तातडीने आवर्तन सोडण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी काल शनिवारी लोणी येथे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन आज रविवारी (दि.१५) नोव्हेंबरपासून भंडारदरा धरणातून बिगर सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे.

Ahilyanagar News
Rahuri Honey Trap Case: राहुरीत हनीट्रॅपचा धक्कादायक प्रकार; तरुणाला घरात घुसून मारहाण, जबरदस्तीने औषध पाजले!

त्यामुळे नदीकाठच्या गावांसह श्रीरामपूर शहराला मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष करण ससाणे हे आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन शहराला किती दिवस आणि कसे पाणी वाटप करायचे याबाबत माहिती देणार आहेत. कालच ना. विखे पाटील यांनी नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या घरी भेट दिली असता, त्यावेळी शहरातील पाणी प्रश्नबाबत तसेच साठवण तलावाचे होत असलेल्या कामाचा त्यांनी आढावा घेतला व पाणीपुरवठा कसा करायचा याबाबतच्या सूचना दिल्या

Ahilyanagar News
Ahilyanagar Theatre Complex: नगरकरांचे नाट्यसंकुलाचे स्वप्न लवकरच साकारणार; काम ९५ टक्के पूर्ण!

पाण्याचा अपव्यय नको

दोन्ही धरणांतून सुटणाऱ्या या आवर्तनाचे नियोजन करताना पाण्याचा कोणताही अपव्यय होणार नाही, याची विशेष दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.