Ahilyanagar DJ Noise Pollution Case: मोठ्या आवाजातील डीजेप्रकरणी नगरात पहिल्यांदाच न्यायालयात खटले

ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन; मंडळ अध्यक्ष व डीजे चालक-मालक अडचणीत
DJ Court Case
DJ Court CasePudhari
Published on
Updated on

नगर: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जास्तीच्या आवाजात डीजे वाजविणे मंडळाच्या अध्यक्षांसह चालक-मालकाला चांगलेच महागात पडले आहे. शहरातील चार गुन्ह्यात संबंधितविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. डीजेच्या गुन्ह्यात पहिल्यांदाचा न्यायालयात खटला दाखल झाला आहे.

DJ Court Case
Ahilyanagar LPG Cylinder Shortage: युद्धाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात सिलिंडरसाठी झुंबड

सार्वजनिक उत्सव व मिरवणुकांमध्ये आता पारंपरिक वाद्यांऐवजी डीजेचा दणदणाट होत आहे. पर्यावरण, ध्वनी प्रदूषण काद्यानुसार 55 डेसिबलच्या पुढे डीजेचा आवाज वाढविणे जीवितास हानीकारक आहे. त्यामुळे सर्वेाच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 55 डेसिबलच्या आत आवाज असणे आवश्यक आहे. परंतु, सार्वजनिक मिरवणुकांमध्ये नियमांची पायमल्ली करून मोठ्या आवाजात डीजे वाजविला जातो. यापूर्वी 55 डेसिबलच्या पुढे आवाज गेल्यानंतर मंडळ अध्यक्ष व चालक मालकाविरोधात गुन्हे दाखल झाले होते. त्यांच्यावर केवळ दंडात्मक कारवाई केली जात होती.

DJ Court Case
Pathardi Kanifnath Muktdwar Darshan: चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या संजीवन समाधीचे आजपासुन सात दिवस मुक्तद्वार दर्शन

पहिल्यांदाच नगर शहराचे पोलिस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांनी ध्वनी प्रदूषण कायद्यातील कलम 15 नुसार गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. त्यात झेंडा मिरवणुकीत आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणुकीत डीजे वाजविणारी मंडळे व चालक मालकाचा समावेश आहे. डीजेच्या गुन्ह्यात न्यायालयात खटला सुरू होणार आहे. त्यामुळे आरोपींना कडक शासन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

DJ Court Case
Chichondi Shirala Road Protest Assault: चिचोंडी शिराळीत मारहाणी प्रकरणावर तीन तासांचा रास्ता रोको

यांच्यावर सुरू होणार खटला

झेंडा मिरवणूक: जलूस गरीब नवाज कमिटी तख्ती दरवाजा अध्यक्ष महमंद हुसेन हाफीज शेख, डीजे चालक-मालक जावेद आयुब शेख, शिवजयंती उत्सव: श्री शंभूराजे प्रतिष्ठाण, जनता गॅरेज मंडळ टी पाईंट सावेडी अध्यक्ष प्रतीक नवनाथ तागड (रा. सावेडी), डीजे चालक मालक महेश चर्तभुज कर्डिले (रा. कर्डिलवाडी, ता. शिरूर, जि. पुणे). श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती नालेगाव, अध्यक्ष मयूर शुभम साठे (रा. नालेगाव), डीजे चालक मालक सचिन वामन आयटे (रा. यरोडा, पुणे), पहिलवान प्रतिष्ठान मंडळ अहिल्यानगर, दर्शन अभय बोरा (रा. माळीवाडा), डीजे चालक-मालक अनिल गणेश पोकळे (रा. वडगाव बुद्रुक, पुणे) अशी खटला दाखल झालेल्यांची नावे आहेत.

DJ Court Case
Rahata Jalgaon CCTV: राहाता तालुक्यातील जळगाव ग्रामपंचायतीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम उलटले; ग्रामस्थ नाराज

शहरातील शांतता भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ध्वनी प्रदूषण कायद्याच्या तरतुदीनुसार कमल 15 नुसार न्यायालयात खटला दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्यांना कडक शासन होणे गरजेचे आहे.

डॉ. दिलीप टिपरसे, पोलिस उपअधीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news