Pathardi Kanifnath Muktdwar Darshan: चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या संजीवन समाधीचे आजपासुन सात दिवस मुक्तद्वार दर्शन

11 ते 17 मार्च दरम्यान दर्शन खुलं; 18 मार्च रोजी फक्त कावडी भक्तांसाठी प्रवेश
Kanifnath
KanifnathPudhari
Published on
Updated on

पाथर्डी: श्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या संजीवन समाधीचे मुक्तद्वार दर्शन यावर्षी दि. 11 ते 17 मार्चदरम्यान भाविकांसाठी खुले राहणार आहे. वाढत्या भाविक संख्येचा विचार करून देवस्थान समितीने यंदापासून सात दिवस मुक्तद्वार दर्शनाची व्यवस्था केली आहे. दि. 18 मार्च रोजी फक्त कावडी घेऊन आलेल्या भक्तांनाच समाधी मंदिरात प्रवेश दिला जाईल, अशी माहिती देवस्थानच्या सरचिटणीस माधुरी मरकड यांनी दिली.

Kanifnath
Chichondi Shirala Road Protest Assault: चिचोंडी शिराळीत मारहाणी प्रकरणावर तीन तासांचा रास्ता रोको

धार्मिक परंपरेनुसार दि. 15 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पापमोचनी एकादशीच्या दिवशी कानिफनाथ देवस्थानचे पुजारी, मढी ग्रामस्थ व नाथभक्त नाथांचे निशाण घेऊन कावडीने पायी गंगाजल आणण्यासाठी श्रीक्षेत्र पैठणकडे प्रस्थान करणार आहेत. यानंतर 16 मार्च रोजी पैठण येथे नाथांच्या निशाणाची भव्य मिरवणूक काढत कावडीने गंगाजल घेऊन वाजतगाजत मढीकडे परतीचा प्रवास सुरू करतील.

Kanifnath
Rahata Jalgaon CCTV: राहाता तालुक्यातील जळगाव ग्रामपंचायतीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम उलटले; ग्रामस्थ नाराज

दि. 18रोजी फाल्गुनी अमावस्येला कावडी मढी-निवडुंगे सीमेजवळील नाथांनी विसावा घेतलेल्या ऐतिहासिक ठिकाणी म्हणजेच फुलबागेत दाखल होणार आहे. या परिसरात पूर्वी दवना वनस्पतीची सुगंधी फुलबाग फुलली होती, अशी श्रद्धा असल्याने येथे दरवर्षी फुलबाग यात्रा भरते.

Kanifnath
Rahata Female Fetus Abortion: राहाता तालुक्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूणहत्या; कडक कारवाईची मागणी

यावेळी कावडीकरांच्या स्वागतासाठी गडावरून वाजतगाजत नाथांचा पंचधातूचा घोडा व अब्दागिरी घेऊन देवस्थानचे विश्वस्त व ग्रामस्थ फुलबागेत जातील. तेथे पैठणहून आलेल्या निशाणाची व नाथांच्या अश्वाची पारंपरिक भेट होऊन पुढील धार्मिक विधी पार पडतील. दरम्यान, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पहाटे चार वाजता महापूजा होईल.

Kanifnath
Ahilyanagar Open Science Park: अहिल्यनगर ‘ओपन सायन्स पार्क’ योजना अडथळ्यात; निधी इतर कामांसाठी वापरला

परंपरेप्रमाणे पुजारी, विश्वस्त व मानकरी यांच्या हस्ते संजीवन समाधीला चंदन उटी (मळी), गोरोचन, गर्भागिरी परिसरातील पवित्र वनस्पती, पंचामृत व दवना यांच्या मिश्रणाचा चंदन लेप लावण्यात येणार आहे. गुढीपाडवा महापूजेनंतर नेहमीप्रमाणे भाविकांसाठी पादुका दर्शन सुरू राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news