Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा आज फैसला; १० जागांसाठी मतदान, उद्या निकाल!

विखे-थोरात विरुद्ध लंके-लोखंडे आघाडीत चुरस; मतदारांना सांभाळण्यासाठी नेत्यांची धावपळ, सहलींमुळे निकालाचा सस्पेन्स वाढला
Ahilyanagar District Bank
Ahilyanagar District BankPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: जिल्हा सहकारी बँकेच्या 10 जागांसाठी आज सोमवारी (दि. २) ३३ केंद्रांवर मतदान होत असून उद्या मंगळवारी (दि.३) लगेच मतमोजणी होणार आहे. ‘ठराव’ घेण्यापासून सुरू झालेली ‘संचालकांची’ पळवापळवी, शेवटच्या टप्प्यातही नेत्यांनी ‘मतदार’ पळवून कायम ठेवली. पारनेरमध्ये खा. लंकेविरोधात मैदानात उतरलेले विखे समर्थक राहुल शिंदे यांच्यातील लढतीकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

Ahilyanagar District Bank
Ahilyanagar Diwali Shopping: अहिल्यानगरच्या बाजारपेठा दिवाळी खरेदीसाठी फुलल्या; रविवार ठरला ‘सुपर संडे’!

अकोल्यातही गायकरांचे शिलेदार ‘गोवा’ सहलीवर आहेत. सभापती शिंदेंचे रामसैनिकही राजस्थानमार्गे उद्या नगरमध्ये पोहचणार असल्याचे समजते. राहुरीतही पडद्यामागे घडामोडींना ‘सोनेरी’ वेग आला आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला होत असलेल्या घडामोडीने निकालाचा सस्पेन्सही वाढला आहे. जिल्हा बँकेच्या २१ संचालक जागांपैकी ११ जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित दहा जागांसाठी २७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत विखे-थोरात यांची सहकार आघाडी आणि खा. नीलेश लंके, सदाशिव लोखंडे यांची परिवर्तन आघाडी यांच्यात लढत आहे.

Ahilyanagar District Bank
Parner Heavy Rainfall: पारनेरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; सात तासांच्या मुसळधार सरींनी ओढे-नाले दुथडी भरून वाहिले

राहुरीत ‘प्रवरा’ची ताकद निर्णायक!

राहुरी सोसायटी मतदारसंघात आमदार प्राजक्त तनपुरे विरुद्ध सत्यजित कदम अशी लढत आहे. अवघे 107 मतदार असलेल्या या मतदारसंघात प्रत्येक मत निर्णायक ठरू शकते. तनपुरे-कदम यांनी कस लावला असला तरी ‘प्रवरा’ची ताकद निर्णायक ठरणार आहे.

पारनेरमध्ये सस्पेन्स कायम..!

पारनेरमध्ये खासदार नीलेश लंके यांच्या विरोधात राहुल शिंदे मैदानात आहेत. 104 मतदार असलेल्या या मतदारसंघात 53 मते जिंकण्यासाठी लागणार आहेत. बहुतेक पर्यटनावर गेले असले तरी १७ मतदार हे पारनेरमध्येच असल्याने तेच निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे.

Ahilyanagar District Bank
Ambijalgaon Road Dispute: आंबीजळगावच्या रस्त्याचा प्रश्न; दहा दिवसांचे उपोषण स्थगित

..तरीही गायकरांनाही लहामटेंची भीती का?

अकोले तालुक्यातून जिल्हा बँक माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या कन्या संजीवनी शिंदे आणि आमदार किरण लहामटे यांच्यात सामना आहे. वैभव पिचड आणि अमित भांगरे हे गायकरांसोबत आहेत. दोघांकडूनही विजयाचा दावा केला जात आहे.

कर्जतमध्ये काही तरी शिजलंय?

कर्जतमध्ये सभापती राम शिंदे समर्थक ज्योती शिंदे आणि अपक्ष तुषार पिसाळ यांच्यात लढत होत आहे. पाच वर्षांपूर्वी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी पडती बाजी फिरवून अवघ्या एका मताने अंबादास पिसाळ हे सिंकदर बनल्याचा इतिहास आहे. येथे चमत्कार घडणार की ठरल्यानुसार याची उत्सुकता आहे.

Ahilyanagar District Bank
Pathardi ATM Theft Attempt: पाथर्डीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न; अलर्ट सिस्टीममुळे चोरी टळली

दोघांच्‍या भूमिकेने गणित बदलणार?

ओबीसी मतदारसंघातून आजिनाथ हजारे आणि महिला राखीवमधून मंजूषा गुंड ह्या उमेदवारांनी अचानक थांबण्याची घेतलेला भूमिका घेतली. त्यामागे ‘गणित’ काय हे निकालानंतरच समजणार आहे. दोन महिला राखीव जागांसाठी पाच महिला उमेदवार रिंगणात आहेत. सहकारकडून अनुराधा नागवडे, संगीता वाघ, तर परिवर्तनकडून हर्षदा काकडे, संध्या महांडुळे हे उमेदवार आहेत. अपक्ष सुवर्णा पाचपुते यांनीही चुरस वाढवली आहे. ओबीसी मतदारसंघात हजारे बाहेर गेल्याने, आता सहकारचे कारभारी जावळे आणि परिवर्तनचे जालिंदर वाकचौरे यांच्यात सरळसरळ लढत आहे. या जागांसाठी 3837 मतदार आहेत.

‘त्या’तीन जागांवरही चुरस

अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात माजी आमदार वैभव पिचड आणि प्रशांत लोखंडे यांच्यात प्रतिष्ठेची लढाई आहे. भटक्या विमुक्त जाती-जमाती मतदारसंघात गणपत सांगळे आणि ऋषिकेश ढाकणे आमनेसामने असून, 3837 मतदार यांना मतदान करतील, तर शेतीपूरक मतदारसंघात आमदार आशुतोष काळे आणि सुधीर म्हस्के यांच्यात लढत होत असून, या मतदारसंघातील 884 मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.