Parner Heavy Rainfall: पारनेरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; सात तासांच्या मुसळधार सरींनी ओढे-नाले दुथडी भरून वाहिले

भोयरे-गांगर्डा परिसराला दिलासा; नगर जिल्ह्यातील ५९ महसूल मंडलांत पावसाची हजेरी, चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची आशा
Parner Heavy Rainfall
Parner Heavy RainfallPudhari
Published on: 
Updated on: 

पारनेर: पारनेर तालुक्यात दुष्काळ झळा जाणवत असतानाच भोयरे आणि गांगर्डा परिसरात शुक्रवारी(दि.३०) मध्यरात्री झालेल्या सात तास ढगफुटी सदृश पावसाने ओढे, नाले तुडुंब भरून वाहते झाले. पावसाने पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काही सुटणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Parner Heavy Rainfall
Ambijalgaon Road Dispute: आंबीजळगावच्या रस्त्याचा प्रश्न; दहा दिवसांचे उपोषण स्थगित

शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता सुरू झालेला पाऊस शनिवारी (दि. ३१) सकाळी ७.३० वाजेपर्यंत जवळपास ७ ते ८ तास अखंड पाऊस सुरू होता. या मुसळधार पावसामुळे भोयरे, गांगर्डा, खडकवाडी परिसरातील छोटे-मोठे ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले. अनेक शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने शेताला तळ्याचे स्वरूप आले होते. महिनाभरापासून कोरडे पडलेले बंधारे, केटी वेअरमध्येही पाणी आले आहे.

Parner Heavy Rainfall
Pathardi ATM Theft Attempt: पाथर्डीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न; अलर्ट सिस्टीममुळे चोरी टळली

दरम्यान, भोयरे-गांगर्डात मुसळधार पाऊस झाला असताना, पारनेर तालुक्यात बऱ्याचशा भागात हलक्या पावसाने हजेरी लावली असून या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. कडूस, रूईछत्रपती, बाबुर्डी, आपधूप, वाळवणे, सुपा, पिंपरी गवळी, रांजणगाव मशीद या परिसरात शुक्रवारी रात्री ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने ज्वारी, बाजरी, मका, कांदा, तूर ही पिके करपून चालली होती. या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला असून करपत असलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.

Parner Heavy Rainfall
Shrirampur Water Supply: श्रीरामपूरकरांना दिलासा; आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा

दुष्काळामुळे पेरण्या वाया गेल्या होत्या, विहिरी, बोअरवेल, तलाव कोरडे पडले होते. या पावसाने थोडा दिलासा मिळाला, पण रब्बी हंगामासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी अजून एक-दोन मोठ्या पावसाची गरज असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला असून शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

मांडवगण, वाळकी, देवदैठण मंडलांत जोरदार सरी

गेल्‍या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील अवकाळी पावसाचे वातावरण असून, शुक्रवारी (दि.३०) नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, संगमनेर,अकोले आणि कोपरगाव तालुक्‍यांतील ५९ महसूल मंडलांत पावसाने हजेरी लावली. श्रीगोंदा तालुक्‍यात सरासरी १५.६ मिलिमीटर, नगर तालुक्‍यात १३.६, कोपरगाव तालुक्‍यात ८.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे चारा उत्‍पादन वाढण्‍यास मदत होणार आहे.

Parner Heavy Rainfall
Akole Ganja Cultivation: दोडक्याच्या पिकात गांजाची लागवड; १५ लाखांचा गांजा जप्त

दरम्‍यान, मांडवगण महसूल मंडलात सर्वाधिक ५२.५ मिलिमीटर, देवदैठण मंडलात ४३.५, वाळकी मंडलात ४१, कोंभळी मंडलात ३४.५, कोळगाव मंडलात ३२ मिलिमीटर पाऊस झाला. शनिवारीही नगर तालुक्‍यातसह काही तालुक्‍यांत आभाळ भरुन आले होते.

गेल्‍या काही दिवसांपासून जिल्‍हाभरात पावसाळी वातावरण निर्माण होत आले. गुरुवारी (दि.२९) नगर तालुक्‍यांत पावसाने हजेरी लावली. चास मंडलात १७.८ मिलिमीटर, केडगाव मंडलात ८ तर नालेगाव मंडलात ५.३ मिलिमीटरची नोंद झाली.

शुक्रवारी (दि.३०) दुसर्‍या दिवशी नगर तालुक्‍यातील सर्वच महसूल मंडलांत अवकाळी सरासरी १३.६ मिलिमीटर पाऊस झाला. वाळकी मंडलात सर्वाधिक ४१ मिलिमीटर तर केडगाव मंडलात २६.८, नालेगावात २१.३, चास मंडलात २६, नेप्‍ती त १६, चिचोंडी पाटील मंडलात १२.८ मिलिमीटर पाऊस झाला. पारनेर तालुक्‍यात ६.८ मिलिमीटरची नोंद झाली. या तालुक्‍यातील पारनेर मंडलात १७, सुपा मंडलात १८, वाडेगव्‍हाण १२.५, वडझिरेत ९.३ मिलिमीटरची नोंद झाली. श्रीगोंदा तालुक्‍यात मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.