Ambijalgaon Road Dispute: आंबीजळगावच्या रस्त्याचा प्रश्न; दहा दिवसांचे उपोषण स्थगित

प्रशासनाचे लेखी आश्वासन आणि ज्येष्ठांची मध्यस्थी; पर्यायी रस्त्यासाठी कार्यवाही न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा
Ambijalgaon Road Dispute
Ambijalgaon Road DisputePudhari
Published on: 
Updated on: 

कर्जत: तालुक्यातील आंबीजळगाव येथील गट नंबर ४७९ व ४८० मधील रस्ता अडवणूक प्रकरणी गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेले उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आणि ज्येष्ठां मध्यस्थीने तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र, प्रशासनाने दिलेल्या पर्यायी रस्त्याच्या आश्वासनावर तत्काळ प्रशासकीय कार्यवाही न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा उपोषणकर्त्यांनी व ग्रामस्थांनी दिला आहे.

Ambijalgaon Road Dispute
Pathardi ATM Theft Attempt: पाथर्डीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न; अलर्ट सिस्टीममुळे चोरी टळली

यावेळी नायब तहसीलदार कारंडे, होगले, सुदाम निकत, रामभाऊ निकत, तय्यब शेख, किरण निकत, विशाल निकत, शिवाजी पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, अभिमान निकत, महेश मोरे, नीलेश निकत, मोहन निकत, ॲड. लोंढे, नितीन, अमोल गायकवाड, कांतीलाल लादे, कांतीलाल राऊत, प्रा. भांडवलकर, किशोर निकत, स्वप्नील देशमुख यांच्यासह उपोषणकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Ambijalgaon Road Dispute
Shrirampur Water Supply: श्रीरामपूरकरांना दिलासा; आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा

आंबीजळगाव येथील गट नं. ४७९ व ४८० मधील रस्ता अडवल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या रस्त्याच्या न्याय्य मागणीसाठी व पर्यायी रस्ता खुला करण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांनी २२ ऑक्टोबरपासून तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. शनिवारी (दि. ३१) या उपोषणाचा १० वा दिवस होता. १० दिवसांनंतरही प्रशासनाकडून ठोस तोडगा निघत नसल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

Ambijalgaon Road Dispute
Akole Ganja Cultivation: दोडक्याच्या पिकात गांजाची लागवड; १५ लाखांचा गांजा जप्त

प्रशासनाचे आश्वासन आणि ज्येष्ठ नागरिकांची मध्यस्थी उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत चालल्याने आणि परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून प्रशासनाने आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. तहसीलदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी "उपोषणाच्या मार्गाने प्रश्न सुटत नसतात, मी योग्य ती कायदेशीर कारवाई करून प्रश्न सोडवेन," असे ठोस आश्वासन लेखी पत्राद्वारे दिले.

Ambijalgaon Road Dispute
Cotton Price In Maharashtra: कापसाला ९ हजारांचा भाव; तरीही शेतकऱ्यांची दिवाळी चिंतेत!

या आश्वासनावर विश्वास ठेवून आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या विनंतीचा मान राखून, उपोषणकर्त्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे अधिकृत पत्र तहसीलदारांना सुपूर्द केले. आंदोलनात रामभाऊ निकत, तय्यबभाई शेख, किरण निकत, विशाल निकत, शिवाजी दादा पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, अभिमान आबा निकत, महेश मोरे, निलेश निकत, मोहन निकत, ॲड. लोंढे, नितीन, अमोल गायकवाड, कांतीलाल लादे, कांतीलाल राऊत, प्रा. भांडवलकर सर, किशोर निकत, स्वप्नील देशमुख सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.