Pathardi ATM Theft Attempt: पाथर्डीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न; अलर्ट सिस्टीममुळे चोरी टळली

बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमला चोरट्याचे लक्ष्य; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित पोलिसांच्या ताब्यात
Pathardi ATM Theft Attempt
Pathardi ATM Theft AttemptPudhari
Published on: 
Updated on: 

पाथर्डी: शहरातील शेवगाव रस्त्यावरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम मशीनचे लॉक तोडून आतील रक्कम चोरण्याचा प्रयत्न चोरट्याने केला. मात्र, एटीएममधील आधुनिक अलर्ट सिस्टीममुळे चोरीचा प्रयत्न फसला असून चोरट्याला रिकाम्या हाताने पळ काढावा लागला. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Pathardi ATM Theft Attempt
Shrirampur Water Supply: श्रीरामपूरकरांना दिलासा; आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा

पाथर्डी शहरातील शेवगाव रस्त्यावर बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा असून बँकेला लागूनच एटीएम मशीन आहे. शनिवारी (दि. ३१) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने एटीएममध्ये प्रवेश केला. त्यानंतर एटीएम मशीनचे लॉक तोडून आतील रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मशीनमधील अलर्ट सिस्टीम कार्यान्वित झाल्याने चोरीचा प्रयत्न उघडकीस येण्याची शक्यता लक्षात येताच संबंधित व्यक्तीने घटनास्थळावरून पळ काढला.

Pathardi ATM Theft Attempt
Akole Ganja Cultivation: दोडक्याच्या पिकात गांजाची लागवड; १५ लाखांचा गांजा जप्त

त्यामुळे एटीएममधील रक्कम चोरीला जाण्यापासून बचावली.या घटनेची माहिती मिळताच रात्री गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर, पोलिस कर्मचारी इजाज सय्यद, महेश रुईकर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्याचप्रमाणे पोलिस निरीक्षक नितीन कंडारे यांनीही एटीएम परिसराची पाहणी केली.

Pathardi ATM Theft Attempt
Cotton Price In Maharashtra: कापसाला ९ हजारांचा भाव; तरीही शेतकऱ्यांची दिवाळी चिंतेत!

सकाळी घटनास्थळी ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एका संशयिताची ओळख पटवून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. प्राथमिक माहितीनुसार, ताब्यात घेतलेली व्यक्ती मनोरुग्ण असून तो पर जिल्ह्यातील असल्याची चर्चा आहे.

Pathardi ATM Theft Attempt
Ahilyanagar Chess Tournament: अहिल्यानगरमध्ये चीनचा बुद्धिबळ खेळणारा रोबोट; खेळाडूंशी थेट भिडणार!

मागील पाच दिवसांपूर्वी शहरातील फुलेनगर येथे धाडसी चोरी झाली होती त्यात लाखोंचा ऐवज चोरी गेला होता तसेच भगवान नगर येथे दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला होता. पुन्हा आता एटीएमकडून चोरीचा प्रयत्न झालेला आहे. या घटनेमुळे चोऱ्याचे प्रमाण वाढत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.