अपघात : कसारा घाटातील दरीत कोसळला कंटेनर

कसारा : घाटात 50 फूट दरीत पडलेला कंटेनर.
कसारा : घाटात 50 फूट दरीत पडलेला कंटेनर.

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
मुंबई-आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉइंटजवळ शनिवारी सकाळच्या सुमारास सिमेंटच्या पेव्हरब्लॉकने भरलेला कंटेनर (एमएच 48 एचएफ 1513) चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट संरक्षक भिंत तोडून 50 फूट दरीत जाऊन कोसळला.

या अपघातात कंटेनरचालक कंटेनरखाली अडकला होता. या अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलिस केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे यांनी कसारा येथील आपत्ती व्यवस्थापन टीमचे श्याम धुमाळ, दत्ता वाताडे, स्वप्निल कलंत्री, विनोद आयरे, अक्षय राठोड, बाळू मांगे, जस्सीभाई यांना घटनास्थळी बोलावून मदत कार्य सुरू केले. ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या जखमी चालकास एक तासाच्या प्रयत्नानंतर क्रेनच्या सहायाने सुखरूप बाहेर काढण्यात या टीमला यश आले. जखमी चालकास उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. चालकाला बाहेर काढण्यासाठी मदतीसाठी मनुष्यबळ कमी असूनही अनेक नागरिक मोबाइलवर शूटिंग करण्यात मग्न होते, याबाबतची खंत टीमचे श्याम धुमाळ यांनी व्यक्त केली.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news