चाकण : गॅसचा गोरख धंदा थांबणार का? | पुढारी

चाकण : गॅसचा गोरख धंदा थांबणार का?

चाकण : बेकायदेशीर मोठ्या गॅसच्या टाकीमधून बारीक गॅसच्या टाकीमध्ये धोकादायक पद्धतीने गॅस भरण्याचा गोरख धंदा चाकण परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोकादायक ठरत आहे. महाळुंगे येथे झालेल्या स्फोटानंतर हा विषय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

चाकण औद्योगिक भागात अजूनही अनेक ठिकाणी दाट लोकवस्तीच्या भागात बेकायदा गॅस भरण्याचा अवैध धंदा जोरात सुरु आहेत. किमान नागरिकांच्या जीविताचा विचार करून यावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी होत आहे. पोलिस, महसुली यंत्रणेच्या अर्थपूर्ण दुर्लक्षाने बेकायदेशीर गँस सिलिंडर रिफलिंगच्या धंद्यांनी चागंलेच बस्तान बसवल्याचे चित्र आहे. त्यावर कडक कारवाईची मागणी होत आहे.

Back to top button