Lok Sabha Election 2024 | निवडणूक खर्च निरीक्षकांकडून मालेगाव व बागलाण मतदार संघातील खर्चाचा आढावा | पुढारी

Lok Sabha Election 2024 | निवडणूक खर्च निरीक्षकांकडून मालेगाव व बागलाण मतदार संघातील खर्चाचा आढावा

धुळे : पुढारी वृत्तसेवा- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ०२- धुळे मतदासंघांकरीता नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक व्यंकटेश जाधव यांनी आज मालेगाव शहर, मालेगाव बाह्य आणि बागलाण मतदारसंघाचा खर्च विषयक आढावा घेतला.

लोकसभेच्या ०२- धुळे लोकसभा मदारसंघात २० मे, २०२४ रोजी निवडणूक होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या मतदासंघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर, मालेगाव बाह्य आणि बागलाण विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक खर्च निरीक्षक श्री. जाधव यांनी मालेगाव, बागलाण येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, सहाय्यक निवडणूक अधिकारी (बागलाण) बबनराव काकडे, मालेगाव बाह्यचे नितिन सदगीर, तहसीलदार (मालेगाव) नितिनकुमार देवरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक श्री. इंगळे, विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक खर्च अधिकारी उपस्थित होते.

खर्च निरीक्षक श्री. जाधव यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि भयमुक्त होण्यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. बैठे व फिरते पथक यांनी आयोगाच्या निर्देशानुसार प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. खर्च विषयक नोंदणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावे. उमेदवारांच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवून उमेदवाराचा प्रत्येक खर्च नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. त्यासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक कार्यवाही करावी, मतदार संघात येणा-या वाहनांची काळजीपूर्वक तपासणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा –

Back to top button