Dhule News | बनावट कागदपत्रांच्या आधारे लाटला शिक्षकाचा पगार, सहा जणांविरोधात गुन्हा | पुढारी

Dhule News | बनावट कागदपत्रांच्या आधारे लाटला शिक्षकाचा पगार, सहा जणांविरोधात गुन्हा

धुळे : पुढारी वृत्तसेवा- शहरातील एका उर्दू शाळेतून बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने शिक्षकाचा पगार लाटून शासकीय पैशांचा अपहार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, या गैरप्रकाराची संबंधित शिक्षण विभागातील अधिकाऱ्याकडे तक्रार करूनदेखील त्याची दखल घेतली गेली नाही.

अलहेरा उर्दू शाळेत शिक्षक सेवेत कायम नसतानाही खोटे कागदपत्रे जोडून पगार काढण्यात आला. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते मुक्तार अन्सारी नूर यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. आसिफ अहमद जैनुल आबेद्दीन (रा. कसाबवाडा), शकील अहमद शेख कासीम (रा. जनता सोसायटी), यास्मीनबानो फिरोज अहमद (रा. जनता सोसायटी), शरीफ शेख यास्मीन सिद्दीकी (रा. धुळे) व अलहेरा उर्दू शाळेचे तत्कालीन प्राथमिक मुख्याध्यापक नदीम खान गलशेर खान यांनी ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. संशयित आरोपी आसिफ अहमद यांना स्वाक्षरीचे अधिकार नसतानाही त्यांना तसे ना हरकत प्रमाणपत्र जिल्हा परिषदेचे (प्राथ.) शिक्षणाधिकारी यांनी बहाल केले. त्याद्वारे शासनाचे पैसे हडपण्यात आले. आरोपींना तत्कालीन मुख्याध्यापक नदीम खान यांनी संरक्षण दिले. तसेच शरीफ शेख यांनीही खोटे प्रमाणपत्र देऊन त्यांना अपहार करण्यास मदत केली. तर, तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी आरोपींकडून अपहाराची रक्कम वसूल केली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार सहा जणांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा l

Back to top button