आढळराव आणि कोल्हें शिवनेरीवर समोरासमोर; एकमेकांना दिल्या ‘या’ शुभेच्छा.. | पुढारी

आढळराव आणि कोल्हें शिवनेरीवर समोरासमोर; एकमेकांना दिल्या 'या' शुभेच्छा..

पुणे : अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळरावांची शिवनेरी गडावर भेट घडली. आढळराव समोर येताच कोल्हे यांनी हस्तांदोलन केलं आणि आढळरावांचा आशीर्वादही घेतला. दोघांनी शिरूर लोकसभेसाठी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान आढळराव पाटील आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आढळराव पाटील उवाच..

पत्रकारांसोबत संवाद साधला असता शिवाजी आढळराव पाटील म्हणाले की हिंदू धर्मामध्ये प्रथा आहे. जेष्ठांच्या पायाला स्पर्श करायचा, कोल्हे यांनी मला शुभेच्छा दिला मी त्यांना शुभेच्छा दिल्या. आढळराव पुढे म्हटले की अनेक वर्षापासून तारखेनुसार आणि तिथीनुसार शिवजयंतीला मी शिवनेरीवर येण्याचा प्रयत्न करत असतो. मी आज शिवनेरीच्या पहिल्या पायरीला नतमस्तक होऊन माझ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली आहे. या पुढचं आयुष्य माझं शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी असणार आहे. शेतीमालाला बाजारभाव मिळण्यासाठी त्याचप्रमाणे कांद्याला बाजार भावासोबतच दुधालाही बाजार भाव देण्यासाठी मी कटिबद्ध असणार आहे. असे ही आढळराव म्हणाले.

नौटंकी मी करत नाही..

आढळराव पुढे म्हणाले की नौटंकी मी करत नाही , मी शेतकरी कुटुंबातील माणूस असल्याने मला शेतकऱ्यांच्या वेदना माहित आहे. शेतकऱ्यांना जे कष्टाचे दिवस पाहावे लागतात ते पाहावे लागू नये. त्यांना न्याय मिळावा शेतकऱ्यांच्या शेती मालाला बाजार भाव मिळावा हे माझं उद्दिष्ट आहे. दीड वर्ष आम्ही मतदारसंघातील प्रश्न सोडवून घेतले आहेत. मी कोणती नोटंकी केलेली नाही मतदारसंघातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी झालो आहे.

डॉ. अमोल कोल्हे उवाच..

दिल्लीच्या तख्तासमोर न झुकण्याची प्रेरणा किल्ले शिवनेरीवर मिळते. वयस्कर व्यक्तीला वाकून नमस्कार करणे ही संस्कृती आहे. म्हणून आढळराव पाटील यांना नमस्कार केला, ही संस्कृती जपली पाहिजे. लढण्यासाठी ताकद द्या, सर्वसामान्य नागरिकांसाठी लढण्याची प्रेरणा द्या, हेच आज शिवनेरीवर नतमस्तक होताना मागणं मागितलं आहे. असे अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

कांद्यासाठी दिल्लीवारी करायला हवी होती…

एक जरी वारी आढळरावांनी दिल्लीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केली असती तर समाधान वाटलं असतं आणि सोबतच आक्रोश मोर्चाची टिंगल त्यांनी केली नसती तर बरं वाटलं असत. व्यावसायिक कामाविषयी मी टीका करणार नाही, पण धोरणात्मक टीका व्हायला हवी. कोल्हे पुढे म्हटले की समोरासमोर बसून चर्चा करु पाच वर्षात मी काय केलं यावर बोलू. 2019 ची निवडणूक मी शरदचंद्र पवार यांच्या आशीर्वादाने केली आणि आताही तेच करतोय, माझ्या भूमिकेत कुठं बदल झालाय? शिरूरसह इतर मतदारसंघात ही मला लक्ष देता येतय.

मोहिते पाटील यांच्याबाबत प्रश्न विचारला असता कोल्हे म्हणाले की तुम्ही मोहिते पाटील म्हणताय यावर शिरूरच्या लोकांचा गैरसमज होईल. विजयसिंह मोहिते पाटील आणि माझे जुने ऋणानुबंध आहेत. मी खूप सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे. हे खरं आहे की शरद पवार यांचा विचार भारी पडतोय. असे ही कोल्हे यांनी सांगितलं.

हेही वाचा

Back to top button