राजकीय बदलांबद्दल लोक बोलत नाही, वाईट वाटतं : आमदार सत्यजित तांबे | पुढारी

राजकीय बदलांबद्दल लोक बोलत नाही, वाईट वाटतं : आमदार सत्यजित तांबे

जळगाव पुढारी वृत्तसेवा-राज्यात बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे युवक गरज नसलेल्या ठिकाणी कामासाठी जात आहे. तसेच राजकीय बदल व राजकीय वातावरणावर लोक बोलत नाहीत याचे वाईट वाटत असल्याची खंत आमदार सत्यजित तांबे यांनी बोलून दाखविली. विधान परिषदचे शिक्षक पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी वर्षपूर्ती झाल्याबद्दल जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

आमदार तांबे पुढे म्हणाले, जळगाव जिल्ह्यात पर्यटन वाढवण्यासाठी व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काम करणार आहे. जिल्ह्यात पर्यटन मंत्री आहे माञ दुर्लक्ष असल्याचे त्यांनी नाव न घेता टोला लगावला. ते पुढे म्हणाले. युनोव्हेशन सेंटरचे तीनशे केंद्र करायचे आहे. जळगाव जिल्ह्यात पर्यटनासाठी व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वर्षभरात काम करायचे आहे. भास्कराचार्य यांनी शून्याचा शोध लावला, त्यांची समाधी याठिकाणी आहे. रामायण लिहिणारे वाल्मीक ऋषी चाळीसगाव येथे आहे. श्रीरामाच्या पाऊलखुणा या ठिकाणी आहे. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटन विकास करण्यासाठी काम करायचे असल्याचे ते म्हणाले.

आज देशातच नव्हे तर राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. गरज नसलेल्या ठिकाणी युवक कामाकडे जात आहे. विकासाचा समतोल वाढला आहे. आजची परिस्थिती चिंताजनक आहे. या पिढीला खूप काही भोगावे लागणार आहे. लोकशाहीमध्ये स्प्लिट असावे लागते त्यामध्ये अभाव दिसत आहे असेही ते म्हणाले.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना राजकारणामध्ये कोणालाही पकडून आणता येत नाही. प्रत्येक राजकीय नेत्याचे त्याच्या मागे विचार असतात, काही गणितं असतात. कोणाची परिस्थिती निर्णय घेते तर कोणाला विकासासाठी निर्णय घ्यावा लागतो. हे देशात पूर्वी पण चालत होते. देशात तसेच अनेक राज्यात आज हे सुरू आहे. आता हे सगळं खूप सहज होत आहे. मात्र लोक यावर काहीच बोलत नाही, याचे वाईट वाटते असेही ते म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button