Nashik News : शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्ताने मंडळांना दिलासा, पालकमंत्र्यांनी दिले हे आदेश | पुढारी

Nashik News : शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्ताने मंडळांना दिलासा, पालकमंत्र्यांनी दिले हे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिवजयंती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणाऱ्या सार्वजनिक मंडळांना जाहिरात व मंडप शुल्कात माफी देण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

शिवप्रेमी व आंबेडकरप्रेमी बांधवांच्या भावना लक्षात घेऊन पालकमंत्री भुसे यांनी हे निर्देश दिले आहेत. यामुळे शहरातील आयोजकांनी भुसे यांचे आभार मानले आहेत. शिवजयंती व डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील सर्व मंडळांना महापालिकेने मंडप शुल्क माफ करावा, अशी मागणी शिवसेना व युवासेना पदाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे भुसे यांच्याकडे केली होती. या मागणीला पालकमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. शिवजन्मोत्सव व डॉ. आंबेडकर जयंती हा उत्सव अठरापगड जातींना एकत्र आणणारा राष्ट्रीय उत्सव आहे. नाशिकमध्येही शिवभक्त हा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. हा संपूर्ण उत्सव सार्वजनिक स्वरूपाचा असतो. तेव्हा शिवजन्मोत्सव सोहळा ज्या जागेत साजरा होतो, त्याचे भाडे प्रशासनाकडून आकारले जाऊ नये, अशा आशयाचे विनंतीपत्र पालकमंत्री यांना देण्यात आले होते.

हेही वाचा :

Back to top button