Sakhi One Stop Center : संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी धुळ्यात ‘सखी वन स्टॉप सेंटर’

Sakhi One Stop Center : संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी धुळ्यात ‘सखी वन स्टॉप सेंटर’
Published on
Updated on

धुळे : पुढारी वृत्तसेवा– कौटुंबिक हिंसाचारासह लैंगिक शोषण, बालविवाह, हुंडाबळी, छळ, जाच, ॲसिड हल्ले, सायबर क्राइम आणि बाल लैंगिक शोषणग्रस्त पिडीतांनी धुळे येथे सखी वन स्टॉप सेंटरमध्ये( Sakhi One Stop Center)  संपर्क साधावा, असे आवाहन धुळे सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र व्यवस्थापक ॲड. रोहिणी महाजन यांनी केले आहे.

महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी केंद्र शासनाने सखी वन स्टॉप सेंटर  (Sakhi One Stop Center) प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित केले आहे. धुळ्यात जिल्हा प्रशासकीय संकुल, जुने कलेक्टर ऑफिस आवारात जिल्हा कोषागार कार्यालयसमोर असलेल्या इमारतीत फेब्रुवारी, 2021 पासुन सखी वन स्टॉप सेंटर सुरु करण्यात आले असून या अडीच वर्षांच्या कालावधीत या सेंटरने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या मदतीने जानेवारी, 2021 ते नोव्हेंबर, 2023 या कालावधीत आजपर्यंत 440 पिडीत महिलांच्या विविध समस्यांवर निवारण करुन त्यांना विविध सेवा उपलब्ध करुन देत न्याय देण्याचे कार्य केले आहे. यात 248 कौंटुबिक हिंसाचार, 14 लैगिंक अत्याचार, 9 बलात्कार, 9 अपहरण/मिसिंग, 1 बाल लैगिंक शोषण, 3 बालविवाह व इतर 156 अशा 440 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे.

अत्याचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय, कायदेशीर मदत, समुपदेशन व गरज असल्यास आश्रयाची सोय उपलब्ध व्हावी, या हेतुने केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाकडून सुरु करण्यात आलेले सखी वन स्टॉप सेंटर महिलांसाठी सहाय्यभूत ठरले आहे. शारीरिक, मानसिक, लैंगिक छळ, कौटुंबिक छळ, ॲसिड हल्ला किंवा सायबर क्राईममधील कोणत्याही अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना पोलीस, वकील, समुपदेशक अशा अनेकांची मदत घ्यावी लागते. अशा वेळी सखी वन स्टॉप सेंटर पिडीतेच्या पाठीशी उभी राहुन लढा देत त्यांना न्याय मिळवुन देण्याचे काम करीत आहे.

सहा प्रकारांची केली जाते मदत (Sakhi One Stop Center)

सखी वन स्टॉप सेंटर मार्फत पिडीत महिलांना सहा प्रकारची मदत केली जाते. यामध्ये कायदेशीर मदत, पोलीस मदत, समुपदेशन, वैद्यकीय मदत, तात्पुरता निवारा, व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा, पोलीस सहायता आदींचा समावेश आहे. हे कार्यालय पिडीत महिलांसाठी 24 x 7 सुरु असते. तसेच महिलांना केंद्रात आल्यावर शासकीय योजनांसंबंधी माहिती दिली जाते. त्याचबरोबर इतर काही अडचणी असतील तर त्याही समुपदेशनद्वारे सोडविल्या जातात. सखी वन स्टॉप सेंटरमध्ये आलेल्या अत्याचारग्रस्त व गरजू महिलांना निवाऱ्याची गरज असल्यास त्यांना सेंटरमार्फत पाच दिवसाचा तात्पुरता निवारा दिला जातो.

असे होते केंद्रातून काम

अत्याचारास सामोरे जावे लागणाऱ्या महिलेला विविध बाबींवर मदतीची आवश्यकता असते. मानसिकरित्या खच्चीकरण झालेल्या या महिलांना एकाच छताखाली मोफत वैद्यकीय सेवा, पोलीस मदत केंद्र, कायदेशीर मदत, समुपदेशन आदी प्रकारच्या सोयीसुविधा दिल्या जातात. सखी वन स्टॉप सेंटर हे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली राबविले जाते. या केंन्द्राच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून एका कर्मचाऱ्यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून हे कार्यालय 24 x 7 सुरु ठेवण्याकरिता 13 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर केंद्राच्या व्यवस्थापनेसाठी केंद्र व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सखी वन स्टॉप सेंटरमध्ये तक्रार घेऊन आलेल्या महिलेला कायदेविषयक मार्गदर्शन लागत असल्यास त्यासाठी एका वकिलाची नियुक्ती करण्यात आली आहे.

संकटग्रस्त महिलांनी प्रत्यक्ष, समाज कार्यकर्त्या किंवा पोलीसामार्फत सखी वन स्टॉप क्रायसेस सेंटरशी संपर्क साधू शकता. यासाठी 181 हा महिला हेल्प लाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. सखी केंद्राची मदत मिळण्यासाठी या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी, सखी वन स्टॉप सेंटर, धुळे केंद्र व्यवस्थापक ॲड. रोहिणी महाजन यांनी केले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news