Jalgaon News : शिवमहापुराण कथेच्या गर्दीतून आणखी 10 चोरट्यांना पकडले ! | पुढारी

Jalgaon News : शिवमहापुराण कथेच्या गर्दीतून आणखी 10 चोरट्यांना पकडले !

जळगाव : येथे शिवमहापुराण कथा सुरू असून कथेच्या पहिल्या दिवसापासून येथे एका आंतरराज्य टोळीने चोरीचा सपाटा लावला आहे. या टोळीला जळगाव पोलिसांनी आळा घातला होता. मात्र, आज पुन्हा शिवमहापुराण कथेच्या गर्दीतून 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या टोळीतील सदस्य मध्यप्रदेशसह राजस्थान येथील असून त्यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील वडनगरी येथे सुरु असलेल्या शिवमहापुराण कथेतून पहिल्याच दिवशी मंगलपोत चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय २७ महिलांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) ने पर्दाफाश केला होता. आज पुन्हा एलसीबीच्या पथकाने टोळीसह 10 जणांना अटक केली आहे. तालुक्यातील वडनगरी फाटा येथे बडे जटाधारी मंदिराजवळ तीन दिवसापासून शिवमहापुराण कथा सुरू आहे. या कथेला जिल्ह्यातून तसेच राज्यातून व राज्य बाहेरून भाविक भक्त आपली उपस्थिती देत आहे.

या गर्दीचा फायदा घेत अनेक चोरट्यांनी या संधीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. पहिल्याच दिवशी जळगाव पोलिसांनी 27 महिलांना ताब्यात घेतले. यानंतर पुन्हा गुरुवारी कथेच्या ठिकाणाहून राजस्थान व मध्यप्रदेशातील दहा जणांची टोळी जेरबंद करण्यात आली असून एकूण संशयितांची संख्या ही ३८ झाली आहे. गुरुवारी पुन्हा एलसीबीच्या पथकाने १० महिलांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. यातील पाच महिला या राजस्थानमधील अलवर, भरतपुर, सदनपुरी याठिकाणारील तर पाच संशयित महिला या इंदौर येथील असून त्या देखील एकमेकांच्या नातलग असून एक संशयीत इलाहाबाद येथील असल्याचे पोलिसांच्या तपसात उघड झाले आहे.

एलसीबीच्या पथकाने पकडलेल्या टोळीमध्ये मिथीलेश बदनसिंगकुमार (वय २८), बिमलेश अनिलकुमार (वय ३५), प्रिया उर्फ ज्योती दीपक साहिल (वय ३०), ममताकुमारी सुभेदारसिंग (वय ३५), बिनाकुमारी जंदेलकुमार (वय ५०, सर्व रा. राजस्थान), किरण रमेश हरजन (वय २३, रा. ईलाहबाद, ता. उत्तरप्रदेश), विजेता राकेश जाटम (वय ३०), उषा सुरज जाटम (वय ४०), सविता बिनकुमार (वय २१), कोमल विजेंदर जाटम (वय २०), कमलेश राजेंद्र जाटम (वय ३५, सर्व रा. इंदौर, मध्यप्रदेश) या संशयितांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना उद्या पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा :

Back to top button