भोर येथे अतिक्रमण काढण्यासाठी नागरिकांचा पुढाकार

भोर येथे अतिक्रमण काढण्यासाठी नागरिकांचा पुढाकार

भोर : पुढारी वृत्तसेवा : भोर शहरातील वाढलेली अतिक्रमणे काढण्यासाठी भोर नगरपालिकेने कारवाई सुरू केली. त्यामुळे रस्त्यावर आलेल्या फलकांसह विविध प्रकारच्या वस्तू संबंधित मालकांनी काढून पालिकेला प्रतिसाद देऊन प्रशासनाचे कौतुक केले.
भोर नगरपालिकेने दि. 1 डिसेंबरपासून अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली असून आतापर्यंत नगरपालिकेने 129 जणांवर कारवाई करून अतिक्रमण काढण्यास सांगितले होते. गुरुवारी (दि. 7) ज्यांनी अतिक्रमण काढले नव्हते, त्यांच्यावर सकाळपासूनच कारवाईला सुरुवात करण्यात आली.

या वेळी दुकानाचे बोर्ड, पर्त्यांची शेड, पायर्‍या काढून घेण्यासाठी नगरपालिकेने 80 जणांना आठ दिवसांची मुदत देऊन अतिक्रमण काढण्यास सांगितले. दिवसभर अतिक्रमण काढत असताना गाळेमालकांनी नगरपालिकेच्या अतिक्रमण मोहिमेस प्रतिसाद देत स्वतः असणारी आपली अतिक्रमणे बाजूला करून दुकानासमोरील जागा मोकळी केली. त्यामुळे वाहतुकीस होणार अडथळा कमी झाला आहे.
मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरअभियंता अभिजित सोनावले, पवन भागणे, महेंद्र बांदल, महादेव बोडके, ज्ञानेश्वर मोहिते, अर्चना पवार, दिलीप भारंबे, अमोल मळेकर, राजेंद्र राऊत, दत्तात्रय जगताप, स्वाती होले, संगीता बोराडे, स्मिता गोडबोले, तसेच ट्रॅक्टर, जेसीबी, 30 कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.

भोर शहरात स्टेट बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, आयडीबीआय या बँकांचे व्यवहार हे खासगी जागेत असून बँकांकडून संबंधित मालक भाडे वसूल करत आहे. परंतु बँकेकडे खातेदारांना गाडी पार्क करण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे खातेदार रस्त्याच्या कडेलाच वाहने लावतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असून बँकांनी खातेदारांसाठी पार्किंगची सोय करावी, असे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी सांगितले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news