पाणी, ज्यूस हाच तिचा 50 वर्षांपासूनचा आहार | पुढारी

पाणी, ज्यूस हाच तिचा 50 वर्षांपासूनचा आहार

हनोई : जगभरात विविध प्रकारचे लोक असे असतात, ज्यांनी आपापल्या जीवनशैलीला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या आवडीनिवडी जोपासण्यावर त्यांचे प्राधान्य असते. आपल्या आवडत्या सवयी ते जोपासतात आणि यातूनच एक स्वतंत्र जीवनशैली आकारास येते. व्हिएतनामच्या एका 50 वर्षीय महिलेवर विश्वास ठेवला, तर मात्र तिची लाईफस्टाईल निव्वळ अचाट आहे. या महिलेने आजवर आपण फक्त पाणी व फळांचा रस यावरच आयुष्य व्यतीत केले असल्याचा अजब दावा केला आहे.

ऑडिटी सेंट्रल वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, मागील 50 वर्षांत या महिलेला सॉलिड फूडची अजिबात चवही माहीत नाही. आतापर्यंत ती फक्त पाणी, ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक इतकेच घेत आली आहे. पण, आश्चर्य म्हणजे इतके असूनही तिला किंचीतही दुबळेपणा जाणवत नाही.

व्हिएतनाममधील क्वांग बिन्ह येथे राहणार्‍या बुई लोई ही आपल्या वयानुरूपही बरीच तंदुरुस्त व निरोगी दिसून येते. पण, तिचा आहार मात्र अविश्वसनीय असाच आहे. या महिलेचा असा दावा आहे की, 1963 मध्ये तिच्यावर वीज पडल्याने ती बेशुद्ध झाली. पण, त्यातून ती वाचली होती. मात्र, त्या धक्क्यातून ती लवकर सावरली नाही आणि तिने काही दिवस काहीही खाल्ले नाही. पुढे काही दिवसांनंतर तिने फलाहार घेतला. पण, ते ही तिला मानवत नव्हते आणि तिने 1970 च्या दरम्यान पूर्णपणे द्रव आहार घेेणे पसंत केले. बुई लोई ही सध्या 75 वर्षांची आहे आणि यापुढेही द्रव आहारावरच भर देणार असल्याचा तिचा दावा आहे.

Back to top button