file photo
file photo

Nashik Crime : वडाळा गावातून कत्तलीसाठी आणलेल्या 11 गोवंशांची सुटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- इंदिरानगर पोलिसांनी वडाळा गावातील मुमताज नगर परिसरात छापा टाकून कत्तलीसाठी आणलेल्या 11 गोवंश प्राण्यांची सुटका केली आहे. याप्रकरणी संशयित इमरान शहा व बबलू कुरेशी यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदिरा नगर पोलीस ठाण्यातील पोलिस अंमलदार भारत शिर्के व त्यांच्यासोबत शालिग्राम झिरवाळ यांना गोपनीय माहिती मिळाली होती. मुमताजनगर आर्मी कंपाऊंडजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये काही प्राणी बंदिस्त असल्याचे समजले. त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन पगार यांना माहिती कळविली. त्यानुसार पगार, एस पारणकर, गुन्हे शोधक पथकाचे मुश्रीफ शेख, सागर परदेशी, योगेश जाधव, प्रकाश नागरे, विशाल पाठक यांचे पथक मुमताजनगर येथे जाऊन पाहणी केली. तेथून पाच गोवंश प्राणी व संशयित इमरान शहा याच्या पत्र्याच्या शेडमधून सहा असे एकूण ११ प्राण्यांची सुटका करण्यात आली. या सर्व प्राण्यांना गोशाळेत देण्यात आले. संशयित इमरान शहा व बबलू कुरेशी यांच्याविरुद्ध जाणवरांना कत्तल करण्याच्या उद्देशाने चारापाण्याची सोय न करता निर्दयीपणे बांधून ठेवले म्हणून इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news