कोल्हापूर : पूणे-बंगळूर महामार्गावर ट्रकला भीषण आग; तावडे हॉटेल येथील घटना | पुढारी

कोल्हापूर : पूणे-बंगळूर महामार्गावर ट्रकला भीषण आग; तावडे हॉटेल येथील घटना

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुणे-बंगळूर महामार्गावर आज (दि. ७) सायंकाळी  मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली. हा ट्रक कर्नाटकहून पुण्याकडे जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.

 पुणे बंगळूर महामार्गावरील तावडे हॉटेल येथे आज (दि. ७) सायंकाळी मालवाहतूक करणाऱ्या एका ट्रकला भीषण लागली. या अगीत ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तावडे हॉटेल येथील उड्डाण पुलावर झालेल्या दुर्घटनेने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. या घटनेतील चालकाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र हा ट्रक कर्नाटकहून पुणेकडे जात असल्याचे सांगितले जात आहे.

Back to top button