वसुबारसने उद्यापासून दिवाळीला प्रारंभ | पुढारी

वसुबारसने उद्यापासून दिवाळीला प्रारंभ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दिव्यांचा सण अर्थात दिवाळीची तयारी सर्वत्र जल्लोषात सुरू आहे. गोवत्स द्वादशीला (गुरुवारी) गाय आणि वासराचे एकत्रित पूजन अर्थात वसुबारसने दीपावलीला प्रारंभ होत असून, बाजारपेठेत खरेदीचाही उत्साह आहे.

मंगळवारी महाद्वार रोड, पापाची तिकटी, बाजारगेट, राजारामपुरी, ताराबाई रोडवर रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी होती. वसुबारस गुरुवारी (दि. 9) होणार असून, यासाठीही पांजरपोळ येथे तयारी सुरू आहे. वसुबारस सण ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा होतो. ऋतुमानानुसार या दिवशी दुधाळ जनावरांना भरडधान्य, ओला चारा दिला जातो. याचीही तयारी ग्रामीण भागात करण्यात येत आहे.

आकाशदिवे, कपडे, पणत्या, इलेक्ट्रिक वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीतून कोट्यवधींची उलाढाल होत आहे. राजारामपुरी, शिवाजी रोड, टेंबे रोड परिसरात गर्दी होत आहे.

Back to top button