

नाशिक: पुढारी वृत्तसेवा; शैक्षणिक पात्रता नसतानाही शिक्षक पदावर पदोन्नती देत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात मालेगाव तालुक्यातील टोकडे येथील विद्या सागर शिक्षण प्रसारक मंडळाच्या तत्कालीन संचालक मंडळासह मुख्याध्यापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेे.
जिल्हा परिषदेचे शिक्षण उपनिरीक्षक उदय व्ही. देवरे यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी जून २०१० ते जून २०१९ या कालावधीत शासनाची फसवणूक केली. देवरे यांच्या फिर्यादीनुसार, शाळेत बी. एड वेतन श्रेणीचे शिक्षक पद रिक्त होते. या पदावर बी. ए. बी. एड. पदवी असलेल्या शिक्षकाची नियुक्ती करणे बंधनकारक असताना संस्थेच्या तत्कालीन संचालक मंडळ व मुख्याध्यापकाने डी. एड. पदविकाधारक शिक्षकास पदोन्नती दिली. तसेच पद उपलब्ध नसतानाही अतिरीक्त एका शिक्षकाची नियुक्ती करून बेकायदेशीर कृत्य करून शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा :