Breaking News : Lalit Patil Drug Case : ललितसह 14 जणांवर मोक्का; नाशिकमधून आणखी 5 किलो सोने जप्त | पुढारी

Breaking News : Lalit Patil Drug Case : ललितसह 14 जणांवर मोक्का; नाशिकमधून आणखी 5 किलो सोने जप्त

महेंद्र कांबळे

पुणे : ससून रुग्णालयातून राज्यभरातील मोठे ड्रगचे रॅकेट चालवणाऱ्या ललित पाटीलसह 14 जणांच्या टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्काची कारवाई करत दणका दिला आहे. ललित पाटील, अरविंदकुमार लोहरे, अमित शहा उर्फ अमित मंडल, रौफ शेख, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, गोलू सुलतान अन्सारी, प्रज्ञा कांबळे, जिशान शेख, शिवाजी शिंदे, राहुल पंडित यांच्यासह समाधान कांबळे, इम्रान शेख, हरिश्चंद्र पंत या 14 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

30 सप्टेंबर रोजी ससून रुग्णालयाच्या गेट जवळून तब्बल दोन कोटी 14 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. हे सर्व रॅकेट्स रुग्णालयातून ललित पाटील चालवत होता. त्याला भूषण पाटील, बलकवडे लोहरे तसेच इतर आरोपी मदत करत होते. मात्र आपण या गुन्ह्यात सडले जाऊ आपल्याला कारागृहाबाहेर आता पडताच येणार नाही. या भीतीने ललित पाटील दोन ऑक्टोबर रोजी पळाला होता.  गुन्ह्याचा तपास करत असताना पुणे पोलिसांनी तब्बल तीन किलो सोनेही जप्त केले होते. सध्या ललित पाटील पुणे पोलिसांच्या कोठडीत असून त्याच्याकडे या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे.

ललित पाटीलकडून आणखी 5 किलो सोने जप्त

अंमली पदार्थ विकून मिळालेल्या पैशातून ललित पाटीलने हे सोने विकत घेतले होते. त्यातील यापूर्वी तीन किलो सोने जप्त केले असताना आता आणखी 5 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. गुरुवारी पुणे पोलिसांची टीम ललित पाटीलला घेऊन नाशिकला गेली होती. त्यानंतर त्यांनी हे सोने जप्त केले.

हेही वाचा

राज्यात प्रादेशिक पाणीसंघर्ष उफाळण्याची चिन्हे!

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्राने ओलांडले पदकांचे दीडशतक!

कोल्हापूर : कारखानदारांना दोन दिवसांचा अल्टिमेटम : राजू शेट्टी

Back to top button