नाशिक : चक्क विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात चोरी | पुढारी

नाशिक : चक्क विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात चोरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या गडकरी चौक परिसरातील कार्यालयात पुन्हा चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. यावेळी चोरट्याने संरक्षण भिंतीवरील साखळी चोरली होती. मात्र, पोलिसांनी तपास करीत संशयित चोरट्यास अटक केली आहे. या आधीही महानिरीक्षकांच्या शासकीय निवासस्थानासह कार्यालयाच्या आवारात चोरीच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त असतानाही चंदन वृक्ष चोरल्याचा प्रकार घडला आहे.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांचे गडकरी चौकात दक्षता हे शासकीय कार्यालय आहे. या कार्यालयाच्या संरक्षक भिंतीवर लावण्यात आलेल्या स्टीलच्या साखळ्या सोमवारी (दि.२३) अकराच्या सुमारास चोरट्याने पळविल्या. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासत चोरट्याची ओळख पटवली. संशयित चोरटा फिरस्ता असल्याचे लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी तपास करीत संशयित गणेश विजय गंधे (४०) यास पकडले. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची ३ हजार रुपयांची साखळी जप्त केली आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित गणेश गंधे विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button