Gunratna Sadawarte | गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड; म्हणाले, यामागे शरद पवारांचा हात | पुढारी

Gunratna Sadawarte | गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड; म्हणाले, यामागे शरद पवारांचा हात

पुढारी ऑनलाईन डेस्क : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या मुंबईतील घराबाहेर त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांची नेहमीच मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका राहिली आहे. आता त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.(Gunratna Sadawarte)

Gunratna Sadawarte | तिघांना अटक

वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यांनी तोडफोड केलेल्या गाड्यांची पाहणी केली आहे. त्यांनी  माध्यमांशी बोलताना यामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप केला आहे. हा हल्ला मराठा क्रांती मोर्चा संबधित कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे समजत आहे. पोलिसांनी तिघांना अटक करण्यात आली आहे. मला हल्लेखोरांना आणि त्या सोबतच मनोज जरांगे पाटील यांना हाच प्रश्न विचारायचा आहे की, हिच आहे का तुमच्या शांततेतच्या आंदोलनाची व्याख्या हीच का? पुढे बोलत असताना ते म्हणाले की, मला सायलेंट केले जावू शकत नाही. ज्या खुल्या वर्गासाठी जागा असतात त्या जागा वाचवण्यासाठी माझा लढा आहे. यापूर्वी ३२ पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नाहक मारहाण करण्यात आली. या संबधित पोलिसांवर कारण नसताना कारवाई करण्यात आली. पुढे बोलताना ते म्हणाले की,मला अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या. त्याचं मला प्रारुप सांगायच आहे. माझी मुलगी झेन गेल्या आठ दिवसांपासून शाळेत जात नाही. तीला मारण्याची धमक्या दिल्या जात आहेत त्याचसोबत जयश्री पाटील यांना उचलुन नेण्याची धमकी दिली जात आहे. मला हे सांगायच आहे की, सर्वसामान्य ५०% लोकांच्या जागा वाचवण्यासाठी पुढे आल्याने अशा प्रकारचे हल्ले होतील. मला सोशल मिडियावरुनही धमक्या येत होत्या.

मनोज जरांगे पाटील यांना अटक करा

पुढे बोलत असताना सदावर्ते म्हणाले की,”हिंदुराष्ट्रातील सर्वांना मला सांगायच आहे की, आता वेळ आली आहे. अशा प्रकारे जाती-जाती म्हणून देशाच्या विचाराला, गुणवत्तेचे तुकडे तुकडे केले जात आहेत. परंतु हे तुकडे न होण्यासाठी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत गुणवंताच्या हक्कासाठी लढत राहीन. जरांगे तुम्हाला सांगतो, तसेच देवेंद्र फडणवीस यांनाही सांगतो महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या हल्ल्यांची शृखंला पोलिसांवरील हल्यापासून सुरु झाली, ती माझ्या घरापर्यंत पोहोचली आहे. आता हे बास करा. ज्या व्यक्तीमुळे पोलिस धारातीर्थ पडले त्या मनोज जरांगे पाटील यांना अटक करा. कारवाई करा. अशी मागणी त्यांनी केली.

मी सुध्दा प्राणांतिक उपोषणाला बसणार

सदावर्ते यांनी सरकारला म्हटलं आहे की, सरकारने फक्त एकट्या जरांगे पाटील याचं ऐकायचं नाही. आम्ही सुध्दा खुल्या वर्गातील गुणवंत लढत आहोत. आमच सुद्धा ऐकलं पाहिजे. जर तुम्हा जरांगे पाटील यांचा लाड करायचा असेल तर, मी सुध्दा प्राणांतिक उपोषणाला बसणार. मला जरांगे पाटील यांना सांगायच आहे पाणी पिवून उपोषण नसते. हे मागासलेपणाचे लक्षण आहे. हे दादागिरीतील मागासलेपण आहे.

(बातमी अपडेट होत आहे)

हेही वाचा 

Back to top button