Nashik Kumbh Mela 2027 : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील १६ पर्यटनस्थळांचा करणार विकास | पुढारी

Nashik Kumbh Mela 2027 : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील १६ पर्यटनस्थळांचा करणार विकास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धार्मिक व पर्यटन विकासावरही भर दिला जाणार असून, शहरातील १६ पर्यटनस्थळांचा विकास केला जाणार आहे. यासाठी सिंहस्थ आराखड्यात सुमारे ६५ कोटींची तरतूद केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पर्यटन विकासांतर्गत पारंपरिक धार्मिक पर्यटनस्थळांचा विकास करतानाच रोप-वे, थिम पार्क, फेरी तसेच गोदा पार्कच्या विकासासाठीही तरतूद करण्यात येत आहे. (Nashik Kumbh Mela 2027)

संबधित बातम्या :

नाशिकमध्ये २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा (Nashik Kumbh Mela 2027) होत आहे. यात लाखो साधू-महंत व कोट्यवधी भाविक येणार आहेत. त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी नाशिक महापालिकेची असल्याने पालकमंत्री दादा भुसे तसेच विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या सूचनेनुसार महापालिकास्तरीय सिंहस्थ आराखडा समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील विविध विभागांना प्रारूप आराखडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या विभागांनी आपापले आराखडे सादर केल्यानंतर सिंहस्थ कामांचा प्रस्तावित खर्च सुमारे 10 हजार कोटींच्या घरात पोहोचला आहे. केंद्र व राज्य शासनाकडून इतक्या मोठ्या प्रमाणावर सिंहस्थ अनुदान मिळणे अवघड असल्याने विभागांनी आपले आराखडे वास्तवदर्शी तयार करावेत, अशा सूचना देत आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी प्रारूप आराखड्यांच्या सादरीकरणास एक आठवड्याची मुदतवाढ दिली होती. ही मुदत पूर्ण झाली असून, आयुक्त डॉ. करंजकर यांच्याकडून सिंहस्थ आराखड्याची आढावा बैठक लवकरच घेतली जाणार आहे. सिंहस्थात देशभरातून भाविक नाशिकमध्ये येणार असल्याने आराखड्यात मूलभूत सुविधांविषयक कामांबरोबरच पर्ययन विकासावरही भर देण्यात आला आहे. या अंतर्गत शहरातील 16 पर्यटनस्थळांचा विकास करण्याची योजना महापालिकेतर्फे आखली जात आहे. याअंतर्गत थिम पार्क प्रस्तावित आहे. एक थिम घेऊन त्यावर आधारित उद्यानाची निर्मिती तसेच गोदावरी नदीपात्रामध्ये जेटी उभारून बोटिंग करणे तसेच रोप-वेची संकल्पना आहे. या माध्यमातून देशभरातून आलेले भाविक नाशिकची चांगली ओळख घेऊन परततील. त्याचबरोबर नाशिककरांच्या मनोरंजनाची साधनेही निर्माण होतील, यादृष्टीने हा पर्यटन विकास साधला जाणार आहे. (Nashik Kumbh Mela 2027 )

पर्यटन विकासाचा प्रस्तावित आराखडा (कंसातील रक्कम कोटींत)

* गोदा पार्क (उजवी बाजू) (१९.१२)

* कपिला संगम (५.८७)

* बापू पार्क (११.०९)

* फेरी (४.००)

* रोप-वे (७.००)

* थिम पार्क (३.०)

* सोमेश्वर धबधबा (२.९७)

* महादेव मंदिर (९६ लाख)

* नवश्या गणपती मंदिर परिसर (१.५२)

* वाघाडी- नागचौक वॉटर फॉल (२.९२)

* नंदिनी-गोदावरी संगम (३.९२)

* समर्थ रामदास स्वामी मठ विकास (१.७०)

* दशरथ घाट, नांदूर (४.४१)

* कुसुमाग्रज उद्यान (७५ लाख)

* पंचवटी (५.००)

* नवीन भाजी बाजार (२.३५)

हेही वाचा :

Back to top button