Asian Games 2023 | १०० पदकांचा टप्पा गाठला! भारतासाठी ऐतिहासिक क्षण : पीएम मोदी | पुढारी

Asian Games 2023 | १०० पदकांचा टप्पा गाठला! भारतासाठी ऐतिहासिक क्षण : पीएम मोदी

पुढारी ऑनलाईन : भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या १४ व्या दिवशी पदकांचे शतक पूर्ण केले. भारताची आशियाई क्रीडा स्पर्धेतील आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. या क्रीडा स्पर्धेसाठी अब की बार १०० पार असा निर्धार करण्यात आला होता. आता प्रत्यक्षात याची स्वप्नपूर्ती झाली आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वर पोस्ट करत भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. (Asian Games 2023)

”आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे! आम्ही १०० पदकांचा उल्लेखनीय टप्पा गाठला याचा भारतातील लोकांना आनंद आहे. ज्यांच्या मेहनतीमुळे भारताने हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे अशा आमच्या अभूतपूर्व खेळाडूंचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.” असे पीएम मोदींनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

प्रत्येक विस्मयकारक कामगिरीने भारताने इतिहास घडवला आणि आमचे हृदय अभिमानाने भरून आले आहे. मी १० तारखेला आमच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंशी संवाद साधण्यास उत्सुक आहे, असेही पीएम मोदींनी नमूद केले आहे.

“आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. आमच्या कबड्डी महिला संघाने सुवर्णपदक जिंकले आहे! हा विजय आमच्या महिला खेळाडूंच्या अदम्य भावनेचा पुरावा आहे. भारताला या यशस्वी कामगिरीचा अभिमान आहे. भारतीय संघाचे अभिनंदन. माझ्या शुभेच्छा. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.” असे पंतप्रधान मोदी यांनी x वर पोस्ट करत म्हटले आहे. (Asian Games 2023)

भारतीय महिला कबड्डी संघाने चायनीज तैपेईला हरवत देशाला २५ वे सुवर्णपदक जिंकून दिले. यामुळे भारताने २५ सुवर्ण, ३५ रौप्य आणि ४० कांस्यपदके जिंकत एकूण १०० पदकांची कमाई केली आहे.

हे ही वाचा :

Back to top button