तुळजापूर, तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीला भाविक भक्तांनी भक्ती भावाने अर्पण केलेले सोने आणि चांदीचे दागिने वितळवण्याचा निर्णय तुळजाभवानी मंदिर संस्थांनी घेतला आहे. त्यानंतर या कामाला रिझर्व बँक ऑफ इंडियाने मंजुरी दिली आहे. मंदिर संस्थांचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाच्या विधी व न्याय खात्याच्या मार्गदर्शनाखाली पुढील कामकाज केले जाईल, अशी माहिती तहसीलदार सोमनाथ माळी यांनी दिली आहे. (Tuljabhawani Devi)
तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून अनेक महत्त्वाचे निर्णय मागील सहा महिन्यांमध्ये घेण्यात आले आहेत. तुळजाभवानी देवीला भाविकांनी अर्पण केलेले सोने आणि चांदी याचा योग्य विनियोग करण्याच्या उद्देशाने संस्थांनी हे प्राचीन दागिने वितळविण्याचा निर्णय घेतला होता. त्याला राज्य शासनाच्या विधी व न्याय खात्यामार्फत रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे परवानगी मागितली होती. मागील तीन महिन्यापूर्वी तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून तीन सदस्य समितीच्या उपस्थितीमध्ये मोजणीचे काम करण्यात आले. या मोजणीचा अहवाल तसेच या संदर्भात नियुक्ती केलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विधी व न्याय खात्याचे मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असे तहसीलदार सोमनाथ माळी यांनी सांगितले. (Tuljabhawani Devi)
मागील १३ वर्षांमध्ये तुळजाभवानी देवीला सोने आणि चांदीचे अनेक लहान मोठे दागिने, वस्तू भाविकांनी अर्पण केलेले आहे. मनी, मंगळसूत्रापासून वेगवेगळ्या पूजेच्या साहित्याचा यात समावेश आहे. या सर्व दागिन्यांची, वस्तूंची मोजतात सीसीटीव्ही कॅमेरे आणि अधिकृत मोजणी करणाऱ्या यंत्रणेकडून करून घेतली आहे. सोने, चांदीचे दागिने वितळवण्याचा शासन निर्णय विधी व न्याय खात्याने ३ ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिद्ध केला आहे. दागिने वितळवून त्याच्या विटा तयार केल्या जाण्याची शक्यता आहे. या विटा बँकेमध्ये सुरक्षित ठेवल्या जाणार असून याचा फायदा मंदिर संस्थांना होणार असून सुरक्षिततेचा मुद्दा निकालात निघणार आहे.
हेही वाचा