नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नांदेडमधील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात गेल्या तीन दिवसांत ३७ जणांचा मृत्यूचा प्राथमिक अहवाल केंद्र सरकारला प्राप्त झाला आहे. त्यानुसार रुग्णांचा मृत्यू औषधांअभावी झालेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे. शासकीय रुग्णालयास भेट दिल्यानंतर पत्रकार परिषदेत डॉ. पवार बोलत होत्या.
संबधित बातम्या :
पवार म्हणाल्या, नांदेड रुग्णालयात नवजात बाळ होते. ते इमर्जन्सी व्हेंटिलेटरवर असतानाच त्यांना दुसरीकडे हलवण्यात आले. समिती संपूर्ण अहवाल देणार असून प्राथमिक अहवालानुसार, रुग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध असल्याचे पवार यांनी सांगितलं आहे. तसेच मृत्यू झालेल्या काही रुग्णांचे वय जास्त होते. अनेक रुग्ण खासगी रुग्णालयातून दाखल झाले होते. काही नवजात बालके खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होते. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. औषधं नसतील तर मागणी केली जाते. केंद्र सरकारकडून औषधे दिली जातात, या मृत्यू प्रकरणांचा दुसरा सविस्तर अहवाल लवकरच येईल, असेही डॉ. पवार यांनी सांगितले. दरम्यान, डॉ. पवार यांनी गुरुवारी (दि.५) जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सुविधा मिळतात की नाही, याची परिस्थिती जाणून घेतली. औषधसाठ्याबाबत माहिती घेतली. अत्यव्यस्थ रुग्णांची माहिती घेत, रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या खाटा वाढवण्याची गरज आहे. कोरोना प्रादुर्भाव सुरु असताना जिल्हा रुग्णालयास पॅकेज देण्यात आलं होते. त्यानंतर अतिदक्षता विभागाच्या खाटांची संख्या ८० होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
हेही वाचा :