सरपंचांसह ग्रामसेवकांच्या अभावी नृसिंहवाडी ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प

सरपंचांसह ग्रामसेवकांच्या अभावी नृसिंहवाडी ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प

 नृसिंहवाडी पुढारी वृत्तसेवा : सरपंच आणि ग्रामसेवकांच्या अभावी नृसिंहवाडी ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले असून विकासकामांना एक प्रकारे मोठी खीळ बसली आहे. सरपंच पार्वती कुंभार यांच्या अपात्रतेचा निर्णय लाल फितीत अडकला असतानाच ग्रामसेवक पदाबद्दल देखील आता संभ्रम निर्माण झाला आहे.

श्रीमती कुंभार यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय कोल्हापूर जात पडताळणी समितीने दिला होता. या निर्णया विरोधात कुंभार यांनी आव्हान दिले होते या आव्हान निर्णयाविरोधात सदस्य चेतन गवळी व रमेश सुतार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सरपंच पार्वती कुंभार यांना अपात्र ठरवून नव्याने सरपंच निवडीसाठी अर्ज केला. यावर सुनावणी पूर्ण झाली आहे परंतु निर्णय अध्याप प्रलंबित आहे सरपंच पार्वती कुंभार यांनी कायदेशीर ससे मीरा टाळण्यासाठी ग्रामपंचायतीच्या कामकाजातील सरपंच पदाबाबत असमर्थता दर्शविली आहे. .

यातच ग्रामसेवक बी. एन. टोणे यांना आगर ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारण्याबाबत बदली आदेश प्राप्त झाला आहे. मात्र अद्याप टोणे हे नृसिंहवाडीचा पदभार सोडण्यास तयार नाहीत. नृसिंहवाडी ग्रामपंचायतीचा पदभार भाग्यश्री केदार यांच्याकडे सोपवला असला, तरीही टोणे यांनी चार्ज न सोडल्यामुळे केदार यांना पदभार स्वीकारण्यात अडचणी येत आहेत. कायदेशीर पेचप्रसंगात अडकलेल्या नृसिंहवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व ग्रामसेवक या पदांबद्दल सावळा गोंधळ सुरू आहे. येथील ग्रामसेवकाच्या बदली बाबत संभ्रम निर्माण झाला असून शिरोळ पंचायत समितीने यातून अद्याप कोणताच मार्ग काढलेला नाही असे समजून आले

श्री क्षेत्र नृसिंहवाडी ग्रामसेवक यांचा शिरोळ आगरचा पदभार रद्द करण्याच्या हालचाली सुरू

सरपंच म्हणतात, "ग्रामपंचायतीत जाणार नाही." आणि ग्रामसेवक म्हणतात, "ग्रामपंचायतीतून जाणार नाही." असा अनोखा विरोधाभास सध्या नृसिंहवाडी ग्रामपंचायतीमध्ये घडतो आहे. अपात्रतेची कारवाई झाली तर चौकशीचा सिसेमिरा मागे नको, म्हणून पार्वती कुंभार या ग्रामपंचायतीकडे येत नाहीत. तर वाढते वय आणि नृसिंहवाडी सारखे ठिकाण याचा विचार करून ग्रामसेवक बी. एन. टोणे बदली होवूनही ग्रामपंचायतीतून जात नाहीत. त्यामुळे येथील ग्रामसेवकाच्या बदली बाबत संभ्रम निर्माण झाला आहे शिरोळ पंचायत समितीने याबाबत अद्याप कोणताही मार्ग काढलेला नाही अशी माहिती शिरोळ पंचायत समिती सूत्राकडून आज दुपारी अधिकृतपणे मिळून आली

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news