धुळे : उसतोडीच्या पैशांवरून वाद ; परस्पर विरोधी फिर्याद दाखल | पुढारी

धुळे : उसतोडीच्या पैशांवरून वाद ; परस्पर विरोधी फिर्याद दाखल

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील विरखेल गावात एका घरासमोर उसतोडीच्या पैशांवरून वाद सुरू होता. या वादाचे पर्यावसाण हाणामारीत झाले. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात परस्पर फिर्यादीवरून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबधित बातम्या :

रणजित पौलाद मोरे रा. विरखेल, ता.साक्री यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिलीप गणपत सोनवणे, नबीबाई दिलीप सोनवणे, योहान सोनवणे सर्व रा. विरखेल हे घरासमोर उसतोडीच्या पैशांवरून वाद घालत होते. त्यांना घरासमोर वाद न करता त्यांच्या घराकडे जाण्यास सांगितले असता राग आलेल्या तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. दिलीप सोनवणे याने कुऱ्हाडीने वार केला. यात कपाळावर गंभीर स्वरूपाची जखम झाली. या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात वरील तिघा संशयितांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास एस. पी. अहिरे करीत आहेत.

तर नबीबाई दिलीप सोनवणे रा. विरखेल, ता. साक्री या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तुम्हाला दिलेले पैसे देवुन टाका, असे सांगितल्याचा राग आल्याने पौलाद रामा मोरे, रंज्या ऊर्फ रणजीत पौलाद मोरे, मीराबाई पौलाद मोरे सर्व रा. विरखेल यांनी शिवीगाळ केली. रणजित मोरे याने त्याच्या हातातील काठीने डोक्यावर वार केला. पती दिलीप सोनवणे यांनी मध्यस्थी केली असता त्यांनाही रणजित मोरे याने काठीने मारहाण केली. या फिर्यादीची दखल घेत वरील तिघांविरूध्द पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button