Pimpri News : पिंपरीतील ’दादा’,’भाई’ वर कारवाई; फॅन्सी नंबर प्लेट लावल्याने1 कोटी 27 लाखांचा दंड वसूल | पुढारी

Pimpri News : पिंपरीतील ’दादा’,’भाई’ वर कारवाई; फॅन्सी नंबर प्लेट लावल्याने1 कोटी 27 लाखांचा दंड वसूल

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : दादा, भाई, दाजी, बाबा अशा शब्दांचा उल्लेख होणारी फॅन्सी नंबर प्लेट वाहनचालक बनवून घेत आहेत. तसेच अनेक वाहनचालक चौकातील तिसरा डोळा अर्थात ‘सीसीटीव्ही’च्या नजरेतून सुटण्यासाठी छोट्या अक्षरात व अंकात गाडीची नंबर प्लेट बनवण्याची अजब शक्कल लढवतात; मात्र सावधान..! आता पिंपरी-चिंचवड वाहतूक विभाग आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) ने कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा वाहनचालकांकडून गेल्या नऊ महिन्यांत 1 कोटी 27 लाखांचा दंड वसूल केला आहे.
यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर महिनाअखेर नंबरप्लेटमध्ये बदल करून, मोटर वाहन कायद्याची पायमल्ली करणार्या एकूण 20 हजारांहून अधिक वाहनचालकांविरोधात वाहतूक आणि आरटीओ विभागाने कारवाई केली आहे. त्यामुळे आता वाहनचालकांना नंबर प्लेटमधील हेराफेरी करणे महागात पडणार असून, आरटीओ आणि ट्रॅफिक विभाग सक्रिय झाला आहे.
‘आरटीओच्या’वतीने मशीनद्वारे वाहनांच्या वेगाची तपासणी केली जाते. नियमापेक्षा जास्त वेगाने धावणार्या वाहनांच्या नंबरची माहिती या मशिनद्वारे समजून येते. अशा पद्धतीने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांना ई- मेल आणि संदेशाद्वारे दंडाची पावती पाठविली जाते. मात्र नंबर प्लेटमध्ये हेराफेरी करून, मशीनमध्ये तसेच सीसीटीव्हीमध्ये आपल्या वाहनाचा नंबर समजून येणार नाही, अशा पद्धतीने काही वाहनचालक छोट्या स्वरूपातील अंक असलेली प्लेट बनवून घेतात. त्यामुळे अशा वाहनांवर कारवाई करताना अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे; मात्र अशा प्रकारे नंबर प्लेट लावणार्‍या वाहनांवरही वाहतूक विभाग नजर ठेवून आहे.

पहिला दंड 500 रुपये तर दुसर्‍यांदा 1500 रुपये

मोटर वाहन कायद्यानुसार, वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये वाहनचालकांनी बदल केल्यास सीएमव्हीआर नियम 50 नुसार, पहिला दंड 500 रुपये तर दुसर्‍यांदा 1500 रुपये दंड भरावा लागणार आहे. किंवा अशा वाहनांचे नोंदणी नूतनीकरण, फिटनेस सर्टिफिकेट तसेच परमीटवरदेखील बंदी आणण्याचे अधिकार परिवहन विभागाला देण्यात आले आहेत.
वाहनचालकांनी नंबर प्लेटमध्ये बदल करून, मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करू नये. त्यामुळे नाहक कारवाईचा मनस्ताप वाहनचालकांना सोसावा लागणार आहे. शहरात अशा वाहनांवर कारवाईसाठी भरारी पथकदेखील सक्रिय करण्यात आली आहेत.
– मनोज ओतारी, सहायक प्रादेशिक 
परिवहन अधिकारी, 
आरटीओ, पिं. चिं. शहर.
यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर महिन्यांतील आरटीओ आणि वाहतूक विभागाची कारवाई
आरटीओट्रॅफिक
वाहनांवरील
कारवाई 217 20423
एकूण दंड 1,26,80,500 11,000
हेही वाचा

Back to top button