Rare Breed Of Snake : मांगीतुंगी डोंगराच्या पायथ्याशी आढळला अतिदुर्मीळ साप | पुढारी

Rare Breed Of Snake : मांगीतुंगी डोंगराच्या पायथ्याशी आढळला अतिदुर्मीळ साप

पिंपळनेर (जि. धुळे) : परिसरातील मांगीतुंगी डोंगराच्या पायथ्याशी मंडाणे गावात शनिवारी (दि.30) सायंकाळच्या सुमारास वन्यजीव संरक्षण संस्था पिंपळनेर येथील सर्पमित्रांनी अतिदुर्मीळ फॉस्ट्रेन मांजऱ्या जातीचा साप पकडला. हा मांजऱ्या प्रजातीतील निमविषारी साप असून, दाट जंगलात आढळतो. याचे मनुष्यवस्तीकडे आढळण्याचे प्रमाण अगदी क्वचित असून, उत्तर महाराष्ट्रात फक्त 2 नोंदी आहेत. तर धुळे जिल्ह्यात या अतिदुर्मीळ सापाची फक्त एकदा नोंद झाली असून, पिंपळनेरच्या सर्पमित्रांनी ही दुसरी नोंद केली आहे. (Rare Breed Of Snake)

मनुष्यास याचा काहीही धोका नाही, असे सर्पमित्रांनी सांगितले. हा साप झाडांवर राहून छोटे पक्षी त्यांची अंडी, सरडे व कीटक खातो. पिंपळनेरसह परिसरात असा दुर्मीळ साप सापडणे हे वन्यजीव प्रेमींसाठी आनंदाची बाब आहे, असे वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी सांगितले. या सापाची पिंपळनेरच्या वनविभागात नोंद करून साप ज्या जंगलाजवळ सापडला त्याच जंगलात सोडले. यावेळी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, उपाध्यक्ष दानिश पटेल, अमोल बहिरम आदी सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button