जालना : समृद्धी कारखान्याच्या भाववाढीचे शेतकऱ्यांकडून स्वागत | पुढारी

जालना : समृद्धी कारखान्याच्या भाववाढीचे शेतकऱ्यांकडून स्वागत

घनसावंगी; पुढारी वृत्तसेवा : गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला समृद्धी साखर कारखान्याने एफआरपी पेक्षा ११० रुपये वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. याची अधिकृत घोषणा गुरुवारी (दि.२१)  कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी केली. या निर्णयाचे आज (दि.२२) अंबड -घनसावंगी तालुक्यातील गावागावात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी फटाके फोडून स्वागत केले.

फटाके फोडून भाववाढीचा आनंद साजरा

गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला घनसावंगी तालुक्यातील समृद्धी साखर कारखान्याने एफआरपी पेक्षा ११० रुपये वाढीव मोबदला देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना २ हजार ८०० रुपये टनप्रमाणे अंतिम बिल मिळणार आहे. गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये अंबड –घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाला मराठवाड्यात उच्चांकी दर देणारा साखर कारखाना म्हणून समृद्धी कारखाना आघाडीवर राहीला आहे. समृद्धी कारखान्याचे व्हाईस चेअमरन महेंद्र मेठी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना ११० रुपये बोनस देण्याचा निर्णय झाला. यानिमित्त घनसावंगी तालुक्यातील भायगव्हाण येथे शेतकऱ्यांनी फटाके फोडून भाववाढीचा आनंद साजरा केला.

यावेळी शेतकरी किसनराव कोरडे, विठ्ठल आबा कोरडे, गजानन कोरडे, अंगत ऐसलोटे, शिवाजी कोरडे, विष्णू कोरडे, रामेश्वर गरड, गोविंद कोरडे, विक्रम कोरडे, विलास कोरडे, सतीश कोरडे, उध्दव कोरडे, बाबासाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर कोरडे, बळीराम कोरडे, विठ्ठल बेलनुर, भिमराव ऐसलोटे, परमेश्वर ऐसलोटे, गोरख कोरडे व गावकरी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button