

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
मौजे विसापूर तालुका येवला येथील शेतकरी संतोष सिताराम सोनवणे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला. बिबट्याला पाहून शेतकरी सोनवणे यांनी वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर परिसरात सर्वत्र ही बातमी समजतात परिसरातील जनसमुदाय बिबट्याला पाहण्यासाठी जमा झाला.
या अगोदर बिबट्याने परिसरात मोठी दहशत तयार केली होती. पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटनाही अनेकदा घडल्या. त्यामुळे परिसरात बिबट्याची मोठी दहशत होती. दीड तासाच्या अथक प्रयत्नांनंतर वनविभागाने बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. बिबट्याला बाहेर काढल्यानंतर परिसरात शांतता पसरली.
या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वनपाल जाधव, वन रक्षक वाघ, खरात, पंकज नागपुरे, गोपाल राठोड़, राजेंद्र दौड़, गोपाल हालगावकर, वनसेवक बालकृष्ण सोनवणे, संजय गुंजाल, अंकुश गुजाल, भाऊसाहेब झाल्टे, कातरणी येथील पोलीस पाटील तुकाराम कदम, गावात पोलिस पाटील, उपसरपंच आणि असंख्य शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा :