नाशिक : गोदावरी एक्स्प्रेसमधल्या बाप्पाला १९९६ पासूनची परंपरा | पुढारी

नाशिक : गोदावरी एक्स्प्रेसमधल्या बाप्पाला १९९६ पासूनची परंपरा

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

शहर, परिसरात बाप्पाचे जल्लोषात आगमन झालेले असतानाच सर्वधर्मीय चाकरमान्यांनी मनमाड-मुंबई गोदावरी एक्स्प्रेसमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

पहिली आरती शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आली. रेल्वेस्थानकात ढोल-ताशे वाजवून जल्लोष करण्यात आला. यावेळी ढोल-ताशाच्या तालावर कांदे यांनी ठेका धरला होता. पाऊस पडू दे, पावसाअभावी मनमाड, नांदगाव शहराबरोबरच संपूर्ण मतदारसंघावर आलेला दुष्काळ दूर कर, असे आपण विघ्नहर्त्याला साकडे घातल्याचे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले. तसेच गोदावरी एक्स्प्रेस पूर्वीप्रमाणे मनमाड येथूनच सोडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सध्या ही गाडी चार दिवस धुळ्यातून, तर तीन दिवस मनमाडमधून सोडली जात आहे. त्यामुळे तीन दिवस मनमाडकरांना त्रास सहन करावा लागत आहे.

संबधित बातम्या :

१९९६ पासून परंपरा

प्रवासात कोणतेही विघ्न येऊ नये, या भावनेने 1996 मध्ये हिंदू-मुस्लीम चाकरमान्यांनी गोदावरी एक्स्प्रेस गणेश मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून आजतागायत अविरत या रेल्वेत श्रीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात असून, त्यासाठी पास बोगीची आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात येते. गणेश मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र खैरे, शिवसेनेचे युवा जिल्हाप्रमुख फरहान खान, शहरप्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, अल्ताफ खान, आकीब पठाण, राजेंद्र भडके, संदीप व्यवहारे, राहुल सांगळे, सुनील पवार आदींनी यंदा पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा :

Back to top button