नाशिक : 'टेस्ट ड्राइव्ह'च्या बहाण्याने कार घेऊन झाला पसार, पोलिसांनी जव्हारमध्ये पकडले | पुढारी

नाशिक : 'टेस्ट ड्राइव्ह'च्या बहाण्याने कार घेऊन झाला पसार, पोलिसांनी जव्हारमध्ये पकडले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी फाटा परिसरातील एका कार मॉलमध्ये अलिशान कारच्या टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने कार परस्पर नेणाऱ्यास इंदिरानगर पोलिसांनी जव्हारमध्ये पकडले.

कपिल अशोक नारंग (४१, रा. गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (दि.२२) दुपारी १.३० वाजता संशयित मनोज प्रकाश साळवे (रा. नाशिक) तेथे आला. त्याने (क्र. जीजी २६, एबी ४८४८) १९ लाख रुपयांच्या कारची टेस्ट ड्राइव्ह घेण्याची मागणी केली. त्यानुसार त्यास टेस्ट ड्राइव्हसाठी कार दिली. मात्र, बराच वेळ होऊनही तो कारसह परत आला नाही. नारंग यांनी त्याचा शोध घेऊनही तो आढळून न आल्याने त्यांनी रात्री ११.३० ला इंदिरानगर पोलिस ठाणे गाठले. संशयिताविरोधात कार अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयित साळवे हा कार घेऊन ठाणे जिल्ह्यात जव्हारमध्ये पोहोचला. इंदिरानगर पोलिसांनी तांत्रिक माहिती आधारे त्याचा माग काढला आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यास पकडले. पोलिस अंमलदार सागर परदेशी यांनी संशयिताला बुधवारी नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने संशयितास पोलिस कोठडी सुनावली.

अनेक गुन्हे दाखल

संशयितावर यापूर्वीही इतर ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहिती इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन पगार यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button