इंग्रजांना पळविले, तसे दोन्ही सरकारला पळवू : नाना पटोले | पुढारी

इंग्रजांना पळविले, तसे दोन्ही सरकारला पळवू : नाना पटोले

चाकण : पुढारी वृत्तसेवा :  केंद्रातील मोदी सरकार हे शेतकर्‍यांच्या आणि सामान्य माणसांच्या जिवावर उठले आहे. केंद्र शासन कांदा निर्यात शुल्क धोरण मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलने केली जाणार आहेत. दोन दिवसांत शासनाने कांद्याबाबत निर्णय घेतला नाही, तर इंग्रजांना जसे पळवून लावले तसेच केंद्र आणि राज्य शासनाला पळवून लावू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चाकण (ता. खेड) येथे दिला. केंद्र सरकारने लादलेल्या 40 टक्के कांदा निर्यात शुल्काविरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली धरणे व पुणे-नाशिक महामार्गावर ’रास्ता रोको’ आंदोलन बुधवारी (दि. 23) करण्यात आले. सुमारे अर्धा तास महामार्ग रोखून धरण्यात आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

या वेळी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह उत्कर्षा रूपवते, अरविंद शिंदे, दादू खान, संग्राम मोहोळ, पृथ्वीराज पाटील, तालुकाध्यक्ष विजय डोळस, जमीर काझी, नीलेश कड पाटील, बाळासाहेब गायकवाड, अमोल जाधव, अनुराग जैद, अमोल दौंडकर, सुनील मिंडे, सतीश राक्षे, सुभाष होले, वंदना सातपुते, जया मोरे, मयूर आगरकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. नाना पटोले यांनी या वेळी केंद्र व राज्य शासनावर कडाडून हल्ला चढविला. पटोले पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानमधून कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू झाल्याचा दावा खोटा आहे. या वेळी पटोले यांनी कांदा निर्यात धोरणाबाबत चाकण मार्केटमध्ये आलेल्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांशी संवाद साधला. शेतकर्‍यांची 50 रुपयांची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी बोलताना चाकण मार्केटमध्ये कांदा उत्पादकांनी प्रतिकिलो कांद्याला 50 रुपयांचा दर मिळावा, अशी आग्रही मागणी केली.

हेही वाचा :

पुणे : महागड्या गाड्यांची हायटेक चोरी करणारे अटकेत बारामती कचरा डेपोस भीषण आग ; ८० लाखांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज 

 J&K : डंपर दरीत कोसळून तिघांचा मृत्यू, एक जखमी

Back to top button