शिरपूर भाजपातर्फे ‘तिरंगा बाईक रॅली’ उत्साहात | पुढारी

शिरपूर भाजपातर्फे 'तिरंगा बाईक रॅली' उत्साहात

धुळे : पुढारी वृत्तसेवा

भारतीय जनता पार्टी शिरपूर शहर व तालुका, भारतीय जनता युवा मोर्चा शहर व तालुका यांच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव निमित्त तिरंगा बाईक रॅली शुभारंभ माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते जनक व्हीला येथून हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. शिरपूर येथे आजादी का अमृत महोत्सव निमित्त तिरंगा बाईक रॅली कार्यक्रम प्रसंगी माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, भाजपा प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य प्रभाकर चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

तिरंगा बाईक रॅली जनक व्हीला, पाच कंदील, बालाजी मंदिर, पाटील वाडा, शिरपूर वरवाडे नगर परिषद, पित्रेश्र्वर कॉलनी, रिक्षा स्टॉप, करवंद नाका या मार्गाने काढण्यात येऊन आमदार कार्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

यावेळी भाजपा प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य प्रभाकर चव्हाण यांनी भाजपच्या हर घर तिरंगा व तिरंगा बाईक रॅली बाबत मनोगत व्यक्त केले. सहभागी झालेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल सविस्तर माहिती देऊन सर्वांनी हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. सांगवी येथे दुर्दैवी घटनेबाबत आमदार अमरिशभाई पटेल यांनी तातडीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करुन घटनेची कल्पना देऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. आमदार काशिराम पावरा यांच्या बाबत दंगलखोरांनी घेतलेली भूमिका व त्यांच्या वाहनाची तोडफोड केल्याबाबत तीव्र शब्दात यावेळी निषेध नोंदविण्यात आला.

भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी म्हणाले, संपूर्ण देशभरात आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत भाजपा तर्फे विविध कार्यक्रम राबविण्यात येत असून नागरिकांनी मोहिमेत सहभागी व्हावे. आभार भाजयुमो तालुकाध्यक्ष आकाश मराठे यांनी मानले.

रॅली मध्ये भाजयुमो तालुकाध्यक्ष आकाश मराठे, पिळोदा उपसरपंच योगेश बोरसे, नितीन गिरासे, पंचायत समिती सदस्य यतिष सोनवणे, प्रभाकर पाटील, बाजार समिती संचालक मिलिंद पाटील, रितेश राजपूत, संदीप कुवर, मंजित पवार, नितीन पाटील, रणजीत राजपूत, नवल परदेशी, भाटपुरा उपसरपंच रोशन सोनवणे, राज सिसोदिया, अभाविप तालुकाध्यक्ष हंसराज चौधरी, राज अहिरे, पवन वाकडे , रवि भील, तसेच भारतीय जनता पार्टी शहर व तालुका व भारतीय जनता युवा मोर्चा शहर व तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते, स्व. तपनभाई पटेल युवा मंच मच्छी बाजार शिरपूर, युवा साम्राज्य ग्रुप शिरपूर, स्व. तपनभाई पटेल युवा मंच शिरपूर तालुका चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button