एकाच शाळेत 17 जुळ्यांचा प्रवेश

एकाच शाळेत 17 जुळ्यांचा प्रवेश

एडिनबर्ग : स्कॉटलंडमधील 32 कौन्सिल परिसरातील इन्वरक्लाईडमध्ये आश्चर्याचा धक्का देणारी एक घटना उघडकीस आली आहे. तेथे पुढील आठवड्यात शाळा सुरू होत असून एकाच वेळी चक्क 17 जुळ्या मुलांनी प्रवेश घेतला आहे. ही आजवरची विक्रमी संख्या आहे, हे याचे अनोखे वैशिष्ट्य. यापूर्वी 2015 मध्ये इन्वरक्लाईडच्या प्रशालांमध्ये चक्क 19 जुळ्यांनी प्रवेश घेतला, हा आजवरचा उच्चांक आहे. शाळेत प्रवेश घेतल्यानंतर ही सारी जुळी मुले विशेष खूश आहेत आणि पुढील आठवड्यासाठी तयारीदेखील करत आहेत.

तसे पाहता, जुळ्या मुलांत काही अंतर निर्माण करणे खूप अडचणीचे ठरू शकते. शिक्षकांच्या अडचणी तर आणखी वाढतात. 'स्काय न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, भाऊ-बहीण अशी 17 जुळी यंदा 18 ऑगस्टपासून शाळेत येणे सुरू करतील. इन्वरक्लाईडमध्ये जुळ्या मुलांचे प्रमाण अधिक असून याचे कारण ट्विनवर क्लाईडच्या रूपात ओळखले जाते.

दोनच दिवसांपूर्वी ग्रीनॉकमधील सेंट पॅट्रिक प्रायमरी स्कूलमध्ये ड्रेस रिहर्सलसाठी प्रथमच शाळेत येणार्‍या मुलांना बोलावण्यात आले होते आणि यात 17 पैकी 15 जुळ्या मुलांनी हजेरी लावली व फोटो सेशनही केले. सेंट पॅट्रिक इनवर क्लाईड अशा दोन शाळांपैकी एक आहे, ज्यात जुळी मुले अधिक प्रवेश घेत आहेत. 2013 ते 2023 या कालावधीत आतापर्यंत या शाळांमध्ये 147 पेक्षा अधिक जुळ्या मुलांनी शिक्षण घेतले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news