बिहारमध्ये सापडला 55 किलोंचा मासा!

बिहारमध्ये सापडला 55 किलोंचा मासा!

सिवान : बिहारमधील सिवान जिल्ह्यात करसर गावामधून पुढे जाणार्‍या एका छोट्याशा कालव्यात चक्क 5 फूट लांब व 55 किलो वजनाचा मासा सापडला असून, याला पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली. हा अवाढव्य मासा प्रारंभी दिसून आला, त्यावेळी स्थानिकांचा त्यावर विश्वासच बसला नाही. पण, नंतर तो मासाच आहे, याची खात्री पटल्यानंतर त्याला पकडण्यासाठी जणू अहमहमिकाच सुरू झाली.

या भागात इतका मोठा मासा मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याने यावरून बरीच चर्चा सुरू झाली. असे म्हटले जाते की, 3 वर्षांपूर्वीदेखील सिवान येथे अशा प्रकारचा मोठा मासा आढळून आला होता. पण, तो ही इतका मोठा नव्हता, असे स्थानिकांनी सांगितले.

करसर गावाच्या आसपास दुपारी काही शेतकरी कालव्याकडून जात असताना त्यांना हा महाकाय मासा आढळून आला. कालव्यात नेहमीपेक्षा अधिक हालचाल दिसून आल्याने काही जणांचे त्याकडे लक्ष गेले. आता इतका मोठा मासा पकडायचा, हादेखील प्रश्न होताच. पण, तरीही काही युवकांनी एकत्र येत जाळ्याच्या साहाय्याने हा मासा पडकला आणि त्याबरोबर काढलेले फोटो सोशल मीडियावरही पोस्ट केले. 'या माशाला गोईटा मासा असे म्हणतात आणि हा मासा नेपाळमधील नद्यांत आढळतो. ज्या ज्यावेळी या नद्यांमधून पाणी कालव्यात सोडले जाते, त्यावेळी हा मासा येथे येण्याची शक्यता असते', असे काही जाणकारांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news