संभाजी भिडेंना तत्काळ अटक करा अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल; आ. कुणाल पाटील यांचा इशारा | पुढारी

संभाजी भिडेंना तत्काळ अटक करा अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल; आ. कुणाल पाटील यांचा इशारा

धुळे : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींबद्दल अवमानकारक वक्तव्य करणार्‍या संभाजी भिडे नामक व्यक्तीला तत्काळ अटक करावी अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान सरकारमध्ये बसलेले जातीयवादी आणि मनुवादी लोक संभाजी भिडे यांना संरक्षण देत आहेत. भिडेंच्या अवमानकारक वक्तव्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकास वेदना झाल्या आहेत. म्हणून भिडेंना अटक करुन कठोर शासन झाले पाहिजे जेणेकरुन येणार्‍या काळात गांधीजींबद्दल अवमान करण्याचे धाडस कोणीही करणार नाही अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी केली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल धुळे जिल्हा व शहर काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्र काँग्रेस कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळ्यातील गांधी पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी संभाजी भिडे यांचा निषेध करीत सरकारवर घणाघात केला. आ.पाटील म्हणाले कि, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यासाठी  स्वताच्या आयुष्याची होळी केली. देशाला समता, बंधुताचा मार्ग दाखवला. महात्मा गांधींमुळे जगात भारताची ओळख आहे. त्यांच्या विचारांच्या आदर्शावर संपूर्ण देश चालत आहे. आणि त्याच राष्ट्रपित्यांचा अपमान करण्याचा दु:साहस संभाजी भिडे यांनी केले आहे. सरकारमधील जातीयवादी आणि मनुवादी विचारांचे लोक संभाजी भिडेंना संरक्षण देत आहेत. भिडेंच्या वक्तव्यामुळे देशातील प्रत्येक नागरीकास वेदना झाल्या आहेत. म्हणून संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करुन त्यांना कठोर शासन झाले पाहिजे, आणि संभाजी भिडे यांना सरकारने अटक केली नाही, तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी आ.कुणाल पाटील यांनी दिला.

निषेध आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, शहर काँग्रेस अध्यक्ष डॉ.अनिल भामरे, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, साबीर खान, पिंताबर महाले, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, माजी पं.स.सभापती भगवान गर्दे, बाजार समितीचे संचालक एन.डी.पाटील, तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष अशोक सुडके, बाजार समितीचे उपसभापती योगेश पाटील, पं.स.चे माजी सदस्य पंढरीनाथ पाटील, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव पाटील, इंटक जिल्हाध्यक्ष प्रमोद सिसोदे, आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा : 

Back to top button