परभणी : रामेटाकळी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार | पुढारी

परभणी : रामेटाकळी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

मानवत, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील रामेटाकळी रस्त्यावर रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका ३१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.२८) रात्री ११ च्या सुमारास घडली. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव रघुनाथ उर्फ सिद्धेश्वर चोखट (रा. सारंगापूर) असे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रघुनाथ चोखट शुक्रवारी रात्री रामेटाकळी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जेवनासाठी गेले होते. रात्री ११ वाजता जेवण करुन बाहेर आल्यावर रस्ता ओलांडत असताना रस्त्यावरून भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रमेश गिरी, गुलाब घुगे, तुकाराम नरगिरे, नरेंद्र कांबळे, प्रकाश अकमार, शिवनद जायभाये यांनी घटनास्थळी धाव घेतली. शवविच्छेदनासाठी मृतदेह शहरातील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता.

हेही वाचा 

Back to top button